Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा समूहातील टीसीएसकडून वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये मोठा बदल; यापुढे अटेंडन्समध्ये...

टाटा समूहातील टीसीएसकडून वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये मोठा बदल; यापुढे अटेंडन्समध्ये...

Tata Consultancy Services : टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या वर्क फ्रॉम-होम धोरणात बदल केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:02 IST2025-02-21T12:02:11+5:302025-02-21T12:02:29+5:30

Tata Consultancy Services : टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या वर्क फ्रॉम-होम धोरणात बदल केले आहेत.

tata consultancy services has changed its work from home policy for employees | टाटा समूहातील टीसीएसकडून वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये मोठा बदल; यापुढे अटेंडन्समध्ये...

टाटा समूहातील टीसीएसकडून वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये मोठा बदल; यापुढे अटेंडन्समध्ये...

Tata Consultancy Services : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्यानंतर समूहाची जबाबदार नोएल टाटा यांच्या खांद्यावर आली आहे. नोएल टाटा यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर समूहात आतापर्यंत अनेक मोठे बदल केले आहेत. यात आता आणखी एकाची भर पडणार आहे. आयटी क्षेत्रातीला आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीसीएसने वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये आपल्या कामगारांसाठी हजेरीचे नियम कडक केले आहेत. अहवालानुसार, या बदलांतर्गत, आता पर्सनल इमर्जन्सी दिवसात, प्रवेशाची अंतिम मुदत आणि बॅकएंड प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहेत.

पर्सनल इमर्जन्सी डे : कर्मचारी कोणत्याही पर्सनल इमर्जन्सीसाठी दर तीन महिन्यांनी ६ दिवस वापरू शकतात. तसेच, कोणताही पर्सनल इमर्जन्सी दिवस शिल्लक राहिल्यास, तो पुढील तिमाहीत फॉरवर्ड करता येऊ शकतो.

अपवादात्मक एंट्री : जागेच्या कमतरतेमुळे, कर्मचारी एका एंट्रीमध्ये जास्तीत जास्त ३० रिक्वेस्ट सबमिट करू शकतात. नेटवर्कशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त पाच वेळा लॉग इन करू शकता. १० दिवसांच्या आत रिक्वेस्ट सबमिट केला नाही तर ती आपोआप नाकारली जाईल. मागील २ कामकाजाच्या दिवसांसाठी बॅकडेटेड एंट्रीला परवानगी आहे. घरून काम करण्यासाठी मिसिंग एंट्री पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत लागू केली जाऊ शकते.

५ दिवस अटेन्डेस धोरण : इतर IT कंपन्यांच्या विपरीत, टीसीएसने आधीच आठवड्यातून ५ दिवस उपस्थिती धोरण लागू केले आहे. तर इतर कंपन्यांमध्ये ते आठवड्यातून तीन दिवस असते.

कामाचे ठिकाणी तणावरहीत वातावरण
वर्क लाईफ बॅलन्स हा मुद्दा गेल्या काही वर्षात सातत्याने चर्चेत येत आहे. टीसीएस कंपनी याबाबत गंभीर असून कामाचे ठिकाण तणावरहीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. टीसीएसचे एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी यावर कंपनीची भूमिका स्पष्ट केली. कर्मचाऱ्यांसाठी चांगलं वातावरण ठेवण्यावर आमचा भर असतो. 

Web Title: tata consultancy services has changed its work from home policy for employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.