Swiggy launches a new app SNACC : भारतात फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स क्षेत्रात वेगाने बदल होत आहे. सध्या क्विक कॉमर्सचा ट्रेंड वाढत जात आहे. अशातच स्विगीने (Swiggy) आपले नवीन ॲप 'Snacc' लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे १०-१५ मिनिटांत फूड डिलिव्हरीचा दावा कंपनीकडून केला जातो. 'Snacc' ॲप हे Google Play Store आणि Apple App Store वर डाउनलोड केले जाऊ शकते.
या ॲपचा उद्देश ग्राहकांना झटपट डिलिव्हरी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. 'Snacc' ॲपमध्ये ग्राहकांना फार कमी वेळात खाद्यपदार्थ मिळतील. स्विगीची ही नवीन सर्व्हिस 'Snacc' फास्ट फूड, रेडी टू इट फूड विकते. हे स्विगीच्या आधीपासून चालू असलेल्या 'Bolt' सेवेपेक्षा वेगळे आहे. स्विगीची Snacc सर्व्हिस Blinkit चे Bistro आणि Zepto चे Cafe सारखीच आहे.
स्विगीचे हे पाऊल भारतातील फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये वेगाने वाढणाऱ्या 'क्विक कॉमर्स' ट्रेंडचा एक भाग आहे. दरम्यान, झोमॅटोने (Zomato) देखील १५ मिनिटांची फूड डिलिव्हरी सर्व्हिस देखील सुरू केली आहे. मात्र, कंपनीने याबाबत फारशी माहिती शेअर केलेली नाही. झोमॅटोच्या ॲपवर '१५ मिनिटे फूड डिलिव्हरी' चा एक नवीन टॅब दिसत आहे, जो या सेगमेंटमध्ये वेगाने वाढणाऱ्या स्पर्धेचा भाग बनू इच्छित असल्याचे स्पष्ट करतो.
झोमॅटोची ही सर्व्हिस मुंबई आणि बंगळुरू सारख्या काही निवडक शहरांमध्ये नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे अशा या सर्व्हिसमुळे स्विगी आणि झोमॅटो या दोन कंपन्यांमध्ये नवी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे फूड डिलिव्हरी क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. झोमॅटो आणि स्विगी व्यतिरिक्त जेप्टो आणि मॅजिकपिन सारख्या इतर कंपन्या देखील आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.