Lokmat Money > बिझनेस न्यूज > संजय कपूर यांचा बिझनेस हडपण्याचा प्रयत्न? कागदपत्रांचाही दुरुपयोग; आई रानी कपूर यांचे गंभीर आरोप

संजय कपूर यांचा बिझनेस हडपण्याचा प्रयत्न? कागदपत्रांचाही दुरुपयोग; आई रानी कपूर यांचे गंभीर आरोप

सोना कॉमस्टारचे चेअरमन होते संजय कपूर, आईने रद्द केली कंपनीची AGM

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:07 IST2025-07-25T14:06:33+5:302025-07-25T14:07:53+5:30

सोना कॉमस्टारचे चेअरमन होते संजय कपूर, आईने रद्द केली कंपनीची AGM

sunjay kapur ex husband of karisma kapoor death his mother rani kapur made serious allegations regarding property | संजय कपूर यांचा बिझनेस हडपण्याचा प्रयत्न? कागदपत्रांचाही दुरुपयोग; आई रानी कपूर यांचे गंभीर आरोप

संजय कपूर यांचा बिझनेस हडपण्याचा प्रयत्न? कागदपत्रांचाही दुरुपयोग; आई रानी कपूर यांचे गंभीर आरोप

अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्व पती बिझनेसमन संजय कपूर (Sunjay Kapur)  यांचं गेल्या महिन्यात १२ जून रोजी निधन झालं. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. संजय हे सोना कॉमस्टार कंपनीचे मालक होते. त्यांच्या निधनानंतर कंपनीत सगळं काही बिनसलं आहे. त्यांची आई रानी कपूर यांनी कंपनीच्या बोर्डाला पत्र लिहिलं आहे. शुक्रवारी होणारी अॅन्युअल जनरल मीटिंग त्यांनी रद्द केली आहे. 

एएनआय नुसार, या पत्रात रानी कपूर यांनी काही आरोप लावले आहेत. लेकाच्या निधनानंतर त्यांच्यावर दबाव बनवण्याचा, कागदपत्रांचा दुरुपयोग करण्याचा आणि कौटुंबिक संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांनी लिहिलं आहे. रानी यांचे वकील वैभव गग्गर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "रानी कपूर या कपूर कुटुंब आणि सोना ग्रुपच्या मुख्य आहेत. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या निधनाने त्यांना धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळे त्यांनी संजय कपूर यांच्या निधनावरच नाही तर त्यांच्या संपत्तीबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलाच्या निधनानंतर काही असामान्य घटना घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे."

सोना कॉमस्टारची एजीएम रद्द करत त्या म्हणाल्या की, "ही मीटिंग अशा परिस्थितीत घेतली जात आहे जेव्हा संजय कपूर यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय धक्क्यात आहे. अनेक प्रयत्न केल्यानंतर मला संबंधित घटनेसंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण किंवा कागदपत्र मिळाले नाही. उलट अशा नाजुक परिस्थीतीत माझ्याकडून कोणतंही स्पष्टीकरण न देता काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या. मला त्याबद्दल काहीही सांगितलं गेलं नाही. तेव्हापासून मला खाते आणि संबंधित कागदपत्रांपर्यंत पोहोचूही दिलं जात नाहीये."

संजय कपूर हे जगातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक होते. सोना कॉसस्टार ही कंपनी त्यांचे वडील सुरिंदर कपूर यांनी १९९७ मध्ये सुरु केली होती. त्यांच्या निधनानंतर आता जेफरी मार्क ओव्हरली यांची कंपनीच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Web Title: sunjay kapur ex husband of karisma kapoor death his mother rani kapur made serious allegations regarding property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.