Lokmat Money > बिझनेस न्यूज > कधी सिक्युरिटी गार्ड तर कधी कॅब ड्रायव्हर; परिस्थितीशी दोन हात करत बनला ४० कोटींचा मालक

कधी सिक्युरिटी गार्ड तर कधी कॅब ड्रायव्हर; परिस्थितीशी दोन हात करत बनला ४० कोटींचा मालक

जर तुमचे कष्ट प्रामाणिक आणि मेहनतीला जिद्दीचा जोड असेल तर नशीबही तुमच्या पायाशी लोटांगण घालतं. आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थितीलाही नमवणाऱ्या रेणुका आराध्या यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:50 IST2023-11-30T11:48:34+5:302023-11-30T11:50:20+5:30

जर तुमचे कष्ट प्रामाणिक आणि मेहनतीला जिद्दीचा जोड असेल तर नशीबही तुमच्या पायाशी लोटांगण घालतं. आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थितीलाही नमवणाऱ्या रेणुका आराध्या यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

success story of pravasi taxi owner renuka aardhya | कधी सिक्युरिटी गार्ड तर कधी कॅब ड्रायव्हर; परिस्थितीशी दोन हात करत बनला ४० कोटींचा मालक

कधी सिक्युरिटी गार्ड तर कधी कॅब ड्रायव्हर; परिस्थितीशी दोन हात करत बनला ४० कोटींचा मालक

Success Story:  आपल्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर नशीब चमकवणारे फार कमी लोक असतात. सोयी-सुविधांचा अभाव असणारं गाव, त्यात उत्पन्नाचं साधन नसताना संकटावर मात करणारे रेणुका आराध्या यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. बंगळुरूमधील एका छोट्या खेड्यामध्ये राहणारे रेणुका आराध्या यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. परिस्थितीली शरण न जाता परिस्थितीशी दोन हात करत  रेणुका आराध्या  हे आज एका ४० कोटींच्या कंपनीचे मालक आहेत.

हलाखीची परिस्थिती असताना त्यांना एकेकाळी लोकांच्या दारोदारी भटकावे लागत होते.  पण आज ते ४० कोटींची कंपनी चालवत आहेत. त्यांच्या कंपनीत शेकडो लोक काम करतात. आजकाल  नोकरी मिळत नसल्याने नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या तरुण पीढीसमोर रेणुका आराध्या यांचा प्रवास आदर्श देणारा ठरेल. पोटाची खळगी त्यांना बराच संघर्ष करावा लागला.

संकटांवर मात केली :

रेणुका आराध्या यांचा जन्म एका  गरीब कुटुंबात झाला. वडील  पुजारी असल्याने घरची परिस्थिती फार चांगली नव्हती.  हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण देखील अर्धवट सोडावं लागलं. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याने रेणुका आणि त्यांचे वडील लोकांच्या दारोदारी जाऊन तांदुळ, डाळ तसेच पीठ मागत असत. जेमतेम  १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण करत रेणुकांनी शिक्षणाला पूर्णविराम दिला. कुटुंबांचं पालन -पोषण करण्यासाठी लोकांच्या घरी घरकाम करण्याच्या पर्यायाचा देखील त्यांनी अवलंब केला.


खडतर प्रवासातून मार्ग काढला :

काही काळ सिक्युरिटी गार्डची नोकरी करत आपला उदरनिर्वाह त्यांनी केला. रेणुकाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. यामुळे त्यांनी सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडून ड्रायव्हिंग शिकण्यास सुरुवात केली. खूप मेहनत करून ते उत्तम ड्रायव्हिंग शिकलं. काही दिवसांनी ते एका ट्रॅव्हल एजन्सीत रुजू झाला. परदेशी पर्यटकांना नेण्यासाठी ते या ट्रॅव्हल एजन्सीत काम करायचे. यामध्ये त्यांना चांगल्या टिप्सही मिळायच्या. त्यांनी सुमारे ४ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले, त्यानंतर त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी उघडण्याचा विचार केला.

Web Title: success story of pravasi taxi owner renuka aardhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.