Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात फंडांनी गुंतविले १३ हजार कोटी

शेअर बाजारात फंडांनी गुंतविले १३ हजार कोटी

घसरलेल्या बाजाराचा फायदा घेऊन म्युच्युअल फंडांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये शेअर्समध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून गुंतवणूक काढून घेतली आहे

By admin | Updated: March 3, 2016 03:52 IST2016-03-03T03:52:51+5:302016-03-03T03:52:51+5:30

घसरलेल्या बाजाराचा फायदा घेऊन म्युच्युअल फंडांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये शेअर्समध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून गुंतवणूक काढून घेतली आहे

Stock markets invested 13 thousand crores | शेअर बाजारात फंडांनी गुंतविले १३ हजार कोटी

शेअर बाजारात फंडांनी गुंतविले १३ हजार कोटी

नवी दिल्ली : घसरलेल्या बाजाराचा फायदा घेऊन म्युच्युअल फंडांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये शेअर्समध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून गुंतवणूक काढून घेतली आहे. २0१५ या वर्षात म्युच्युअल फंड कंपन्यांनी शेअर्समध्ये ७0,७१६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आहे. त्यामुळे यंदा म्युच्युअल फंडांत पारिवारिक बचत मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारात ५,९४६ कोटी रुपये ओतले. त्याआधी जानेवारीत त्यांनी शेअर बाजारात ७,३२८ कोटी रुपये ओतले होते. अशा प्रकारे दोन महिन्यांतील त्यांची एकूण १३,२७४ कोटींची गुंतवणूक बाजारात झाली आहे. या दोन महिन्यांच्या काळात विदेशी गुंतवणूकदारांनी मात्र शेअर बाजारातून १६,६४५ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. गेल्या वर्षी विदेशी गुंतवणूकदारांनी १७,८0६ कोटी रुपये गुंतविले होते.

Web Title: Stock markets invested 13 thousand crores