lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजाराचा ७७०चा शॉक; गुंतवणूकदारांवर मंदीचे विघ्न!

शेअर बाजाराचा ७७०चा शॉक; गुंतवणूकदारांवर मंदीचे विघ्न!

एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५५ लाख कोटी खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 06:10 AM2019-09-04T06:10:27+5:302019-09-04T06:10:42+5:30

एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५५ लाख कोटी खाक

 Stock market shock of 2; Investors' recession hit! in sensex | शेअर बाजाराचा ७७०चा शॉक; गुंतवणूकदारांवर मंदीचे विघ्न!

शेअर बाजाराचा ७७०चा शॉक; गुंतवणूकदारांवर मंदीचे विघ्न!

सेन्सेक्स : अर्थसंकल्पाच्या दिवशी गेला होता ४० हजारांवर, आता आला ३६,५६२ वर

मुंबई : अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत अडकली असताना शेअर बाजारात गुंतवणुकदारांना मंगळवारी जोरदार झटका बसला. शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ७७० अंकांनी कोसळला. निफ्टीनेही २२५ अंकांची डुबकी घेतली. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे २ लाख ५५ हजार कोटी रूपये पाण्यात गेले.

मंगळवारी बाजार सुरू होताच अनेक गुंतवणूकारांनी विक्रीचा मारा सुरू केला. २.०६ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स ३६,५६२.९१ अंकांवर बंद झाला. निफ्टीही २२५.३५ अंक आपटून १०,७९७.९० अंकांवर बंद झाला.

हे आपटले : आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, वेदांता, एचडीएफसी, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स
इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी

काय आहेत पडझडीची कारणे?
चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धीदर ५ टक्क्यांवर आला. शिवाय आठ पायाभूत क्षेत्रांच्या वृद्धीचा दरही खाली आला आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या निर्देशांकाने तर १५ महिन्यांचा नीचांक गाठला आहे. ही निराशाजनक आकडेवारी मंदीचे संकेत देणारी आहे.

जागतिक पातळीवर बाजारासाठी सकारात्मक चित्र सध्या नाही. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध आणखी चिघळत चालले आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार नव्या गुंतवणुकीचा विचार करताना दिसत नाहीत.

देशातील ग्रामीण भागातील क्रयशक्ती प्रचंड घसरली आहे. रोजगाराची आकडेवारीही निराशाजनक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वस्तूंची विक्री मंदावली आहे.

सरकारने बँकांचे विलिनीकरण केल्याचा मोठा परिणाम बँकिंग शेअर्सवर झाला. ही प्रक्रिया अवघड असल्याने बँकांचे शेअर्स कोसळले.

Web Title:  Stock market shock of 2; Investors' recession hit! in sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.