lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea: फक्त ३ लाखांत सुरु करा ‘हा’ व्यवसाय; दरमहा कमवा ५० हजारांचा नफा, अल्पावधीतच लाखोंची कमाई!

Business Idea: फक्त ३ लाखांत सुरु करा ‘हा’ व्यवसाय; दरमहा कमवा ५० हजारांचा नफा, अल्पावधीतच लाखोंची कमाई!

Business Idea: गाव असो वा शहर, या उत्पादनाला प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये मोठी मागणी असते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 03:33 PM2022-09-09T15:33:38+5:302022-09-09T15:34:55+5:30

Business Idea: गाव असो वा शहर, या उत्पादनाला प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये मोठी मागणी असते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

start soap manufacturing work you can earn 50 thousand profit in every month know business idea | Business Idea: फक्त ३ लाखांत सुरु करा ‘हा’ व्यवसाय; दरमहा कमवा ५० हजारांचा नफा, अल्पावधीतच लाखोंची कमाई!

Business Idea: फक्त ३ लाखांत सुरु करा ‘हा’ व्यवसाय; दरमहा कमवा ५० हजारांचा नफा, अल्पावधीतच लाखोंची कमाई!

Business Idea: कोरोना संकटकाळात हजारो लोकांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नवनवीन व्यवसाय, उद्योग सुरू केले. आजही नेटाने उद्योग, व्यवसाय सांभाळत आहे. काही व्यवसाय, उद्योग असे आहेत की, कमी गुंतवणुकीतून आपण अल्पावधीत लाखोंची कमाई करू शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत, तर काहींना नोकरीचा कंटाळाही आला आहे. अशी मंडळी कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळू शकणारा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. 

हा असा व्यवसाय आहे ज्याच्या उत्पादनाची मागणी प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये आहे. गाव असो वा शहर, या उत्पादनाला प्रचंड मागणी आहे. आम्ही साबण उत्पादनाबद्दल बोलत आहोत. या व्यवसायात मशिनच्या साहाय्याने साबण तयार करून ते बाजारात पोहोचवले जातात. आजच्या काळात साबणाची मागणी लहान शहरांपासून मोठी शहरे ते ग्रामीण भागातही आहे. त्यामुळे साबण बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अगदी कमी पैशात तुम्ही साबण कारखाना उघडू शकता.

केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेतून कर्ज

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत ८० टक्के कर्ज घेऊ शकता. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. साबण उत्पादन युनिट उभारण्यासाठी एकूण १५,३०,००० रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये युनिटचे स्थान, यंत्रसामग्री, तीन महिन्यांचे खेळते भांडवल यांचा समावेश आहे. या १५.३० लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त ३.८२ लाख रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित रक्कम तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकता.

निव्वळ नफा ६ लाख रुपये असेल

केंद्र सरकारच्या मुद्रा योजना प्रकल्प प्रोफाइलनुसार, तुम्ही एका वर्षात एकूण सुमारे ४ लाख किलो उत्पादन करू शकाल. त्याची एकूण किंमत सुमारे ४७ लाख रुपये असेल. व्यवसायातील सर्व खर्च आणि इतर देवाण-घेवाण पूर्ण केल्यानंतर, तुमचा निव्वळ नफा ६ लाख रुपये असेल म्हणजे दरमहा ५०,००० रुपये कमावू शकता. 

मागणी आणि बाजारपेठ लक्षात घेऊन उत्पादन

साबण बाजार त्याच्या वापराच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागला जाऊ शकतो. मागणी आणि बाजारपेठ लक्षात घेऊन तुम्ही तुमची उत्पादने यापैकी कोणत्याही श्रेणीनुसार तयार करू शकता. यामध्ये लाँड्री साबण, सौंदर्य साबण, औषधी साबण, किचन साबण, सुगंधी साबण अशा प्रकारांनुसार साबणांचे उत्पादन घेतले जाऊ शकते. 
 

Web Title: start soap manufacturing work you can earn 50 thousand profit in every month know business idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.