Starbucks New Rule : प्रत्येकाला आपल्या कॉलेज जीवनात कधी ना कधी स्टारबक्सला कॉफी पिण्याची इच्छा झाली असेल. या कॅफेमध्ये तुम्हाला एकदम श्रीमंत झाल्याचा फिल येईल, अशाच प्रकारे याची रचना असते. तुम्हीही स्टारबक्सचे चाहते असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टारबक्सने आपल्या सेवेत मोठा बदल केला आहे. कंपनीने आता आपल्या कॅफे आणि बाथरूमचा वापर फक्त पैसे देणाऱ्या ग्राहकांपुरताच मर्यादित ठेवला आहे. याआधी, कोणीही काहीही खरेदी न करता कॅफे आणि बाथरूम वापरू शकत होता. आता कंपनीने नवा नियम लागू केला आहे.
कोड ऑफ कंडक्टमध्ये मोठा बदल
ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. कंपनीने नवीन कोड ऑफ कंडक्ट जारी केला आहे. जे ग्राहक काही खरेदी करतात तेच कॅफेमध्ये बसू शकतात किंवा बाथरूम वापरू शकतात, असा निर्णय घेण्यात आला आहे. २७ जानेवारीपासून हा नियम लागू होणार असून प्रत्येक शॉपमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे.
स्टारबक्सचा यू-टर्न
याशिवाय या नियमांची अंमलबजावणी कशी करायची याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. कोणी नियम मोडल्यास त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. गरज पडल्यास स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जाऊ शकते. Starbucks ने २०१८ मध्ये हा नियम बनवला होता. यामध्ये कुठल्याही खरेदीशिवाय कॅफेमध्ये बसण्याची परवानगी होती. एका घटनेनंतर कंपनी हे पाऊल उचललं होतं. अमेरिकेत एका स्टोअर मॅनेजरने शॉपमध्ये २ आफ्रिकन अमेरिकन लोकांना बाहेर काढलं होतं. यानंतर बराच वाद निर्माण झाला होता.
नवीन धोरणाचाही समावेश
Starbucks “फ्री रिफिल” पॉलिसी पुन्हा लागू करणार आहे. म्हणजे आता मेंबर्स नसलेल्यांनाही एका खरेदीनंतर मोफत रिफिलचा लाभ मिळू शकेल. यासाठी रियूजेबल कप किंवा सिरॅमिक कपमध्ये घ्यावे लागेल. यापूर्वी ही सुविधा फक्त रिवॉर्ड सदस्यांसाठी होती. याशिवाय, कंपनीने कोरोना महामारीदरम्यान बंद केलेल्या साखर आणि दुध बार पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.