Jeet Gautam Adani News: देशातील प्रसिद्ध बिझनेस रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियाचा (Shark Tank India) चौथा सीझन सध्या सुरू आहे. या सीझनच्या एका एपिसोडमध्ये दिग्गज बिझनेसमन गौतम अदानी (Gautam Adani) यांचे चिरंजीव जीत अदानी (Jeet Adani) गेस्ट मेंटॉर म्हणून आले होते. शार्क टँक इंडियाच्या सेटवर जीत अदानी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. यात त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि या काळात केलेल्या दानाबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. जीत अदानी यांनी नुकतंच ७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे दिवा जैमिन शाह यांच्यासोबत विवाह केला.
वैवाहिक जीवनाबाबत काय म्हणाले?
शार्क टँक इंडियाचे जज श्रीकांत बोल्ला यांनी जीत अदानी यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारलं असता त्यांनी अविश्वसनीय असं म्हटलं. याशिवाय जीत अदानी यांनी यावेळी अनुपम मित्तल यांच्या एका ट्विटचाही उल्लेख केला आणि म्हटलं की, "त्यांनी ट्वीट केलं की त्यांनी माझी प्रोफाइल डिलीट केलीये. जेन-झी आणि मिलेनिअल्सना लग्नात रस नाही," असंही ते म्हणाले.
हजारो कोटींचं दानही दिलं
जीत अदानी यांच्या लग्नादरम्यान अदानी कुटुंबानं जवळपास १० हजार कोटी रुपयांचं दान दिलं. 'भारतीय गुजराती संस्कृतीत लग्न हा एक मोठा उत्सव आहे, असा आमचा नेहमीच युक्तिवाद असायचा. आपण वेगळे काय करू शकतो, असा आम्ही विचार केला. त्यामुळे आम्ही काही कारणं निवडली जी आमच्या हृदयाच्या जवळ होती," असं जीत अदानी म्हणाले.
दिव्यांग महिलांच्या लग्नावर खर्च
सर्वात मोठा प्रश्न होता दिव्यांग व्यक्तींना आधार कसा द्यायचा. लग्नाच्या सुरुवातीला आम्ही मंगल सेवा सुरू केली जिथे आम्ही अनेक दिव्यांग महिलांना आधार दिला, असं जीत अदानी म्हणाले.