स्पेन भारताच्या पेट्रोलियम निर्यातीचे नवे केंद्र; ४६,०००% वाढ; रशियाचे तेल आणखी स्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सप्टेंबर महिन्यात भारताची स्पेनला झालेली पेट्रोलियम उत्पादने निर्यात ४६,००० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे स्पेनला होणारी भारताची एकूण निर्यात १५१ टक्क्यांनी वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ च्या सप्टेंबरमध्ये भारताने स्पेनला केवळ १.१ दशलक्ष डॉलर्सची पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली होती, ती यंदाच्या सप्टेंबरमध्ये वाढून ५१३.७ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. स्पेनकडे थेट निर्यातीमुळे नेदरलँड्ससारख्या पारंपरिक खरेदीदार देशाकडे भारताने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.
रशियन तेलाच्या किमतीत झाली मोठी घसरण
अमेरिकेच्या नवीन निर्बंधांमुळे रशियन कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली असून, हे दर गेल्या एका वर्षातील सर्वात कमी पातळीवर पोहोचले आहेत.
ट्रम्प यांनी लादलेल्या निर्बंधांनंतर रशियाला तेल निर्यातीत मोठा फटका बसला आहे. या घसरणीमुळे रशियन तेलावर दिल्या जाणाऱ्या सवलती वाढल्या आहेत.
ते ब्रेंट क्रूडच्या तुलनेत प्रतिबॅरल ८ ते १० डॉलरच्या स्वस्त दराने विकले जात आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये रशियाच्या तेल उत्पन्नात २७% नी घसरण झाली आहे.
घट युरोपीय महासंघाला होणाऱ्या भारताच्या पेट्रोलियम उत्पादन निर्यातीत झाली. ही निर्यात १,४७३.२ दशलक्ष डॉलरवरून १,४२०.१ वर आली.
Web Title : स्पेन बना भारत के पेट्रोलियम निर्यात का नया केंद्र
Web Summary : सितंबर में स्पेन को भारत का पेट्रोलियम निर्यात 46,000% बढ़ा, जिससे कुल निर्यात 151% बढ़ा। इस बदलाव ने नीदरलैंड जैसे पारंपरिक खरीदारों को पीछे छोड़ दिया। साथ ही, नए अमेरिकी प्रतिबंधों के कारण रूसी तेल की कीमतें गिर गईं, जिससे रूस के तेल राजस्व पर असर पड़ा और भारत के यूरोपीय संघ के पेट्रोलियम निर्यात पर मामूली प्रभाव पड़ा।
Web Title : Spain Emerges as New Hub for India's Petroleum Exports
Web Summary : India's petroleum exports to Spain surged 46,000% in September, boosting overall exports by 151%. This shift sidelines traditional buyers like the Netherlands. Simultaneously, Russian oil prices plummeted due to new US sanctions, trading at a significant discount, impacting Russia's oil revenue and slightly affecting India's EU petroleum exports.