नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोनाली सेन गुप्ता यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली आहे.
या पदावर नियुक्त होण्यापूर्वी, सोनाली सेन गुप्ता या बंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयात कर्नाटक राज्यासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होत्या. तीन दशकांहून अधिक काळ रिझर्व्ह बँकेत काम केलेल्या सोनाली यांनी मानव संसाधन व्यवस्थापन, बँकिंग नियमन आणि देखरेख आदी क्षेत्रांमध्ये काम केले आहे.
त्यांनी जी२०च्या ग्लोबल पार्टनरशिप फॉर फायनान्शिअल इन्क्लूजन व ओइसीडीच्या इंटरनॅशनल नेटवर्क ऑन फायनान्शिअल एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय मंचांवर आरबीआयचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, राष्ट्रीय आर्थिक साक्षरता केंद्राच्या संचालक मंडळावरही त्या संचालक म्हणून कार्यरत राहिल्या आहेत.