नवी दिल्ली: केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने किरकोळ विक्रेते आणि लघु उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
‘फेडरेशन ऑफ रिटेलर असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एफआरएआय) या दरवाढीवर गंभीर आक्षेप घेतला असून, यामुळे अवैध तंबाखू बाजार वाढेल आणि लाखो छोट्या दुकानदारांची रोजीरोटी संकटात येईल, असा इशारा दिला आहे.
‘एफआरएआय’ने म्हटले की, कायदेशीर उत्पादनांच्या किमती गगनाला भिडतात, ग्राहक स्वस्त, अवैध पर्यायांकडे वळतो. यामुळे सरकारचा महसूल बुडतोच, पण छोट्या दुकानदारांनाही घटत्या उत्पन्नाचा सामना करावा लागतो.
