SIM Swap Fraud: देशात गेल्या काही वर्षांमध्ये सिम स्वॅप फ्रॉड (SIM Swap Fraud) मध्ये मोठी वाढ झाली आहे. ही अशी फसवणूक आहे, ज्यात फसवणूक करणारा तुमचा मोबाईल नंबर त्याच्या नियंत्रणाखाली घेतो. ते दूरसंचार कंपनीला फसवून तुमचा नंबर एका नवीन 'सिम' मध्ये पोर्ट करून घेतात. तुमचा नंबर त्यांच्याकडे येताच, त्यांना बँक आणि इतर सेवांकडून येणारे ओटीपी (OTP) मिळतात. याच ओटीपीच्या मदतीने ते पासवर्ड रीसेट करणं, पैसे ट्रान्सफर करणं आणि खातं ताब्यात घेणं यांसारखे मोठे फ्रॉड करतात.
२०२४-२५ मध्ये अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि दूरसंचार विभाग (DoT) यांनी दूरसंचार कंपन्यांना आणि बँकांना इशारा दिला आहे. आता एसएमएस-आधारित ऑथेंटिकेशन अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि फ्रॉड चेक मजबूत करण्यासाठी नवीन नियम लागू केले जात आहेत. CERT-IN आणि राज्यांच्या सायबर युनिट्सनं देखील 'सिम पोर्टिंग स्कॅम'ला मोठ्या आर्थिक फसवणुकीचे मुख्य कारण असल्याचं सांगितलं आहे.
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
एसएमएस ओटीपी ऐवजी 'हे' उपाय वापरा
तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, महत्त्वाच्या खात्यांमध्ये एसएमएस ओटीपीऐवजी अॅप-आधारित ऑथेंटिकेटर (App-Based Authenticator) किंवा हार्डवेअर सिक्युरिटी-की चा वापर सुरू केला पाहिजे. याव्यतिरिक्त, खालील पद्धती अधिक प्रभावी ठरतात:
- आपल्या सिमवर पिन सेट करणे.
- ऑपरेटरकडून पोर्ट-आऊट लॉक किंवा नंबर लॉक लावून घेणे.
- बँकेत मोबाईल नंबरला केवळ रिकव्हरी कॉन्टॅक्टपर्यंत मर्यादित ठेवणे.
'नो सर्व्हिस' दिसल्यास ताबडतोब सावध व्हा
जर तुमच्या फोनमध्ये अचानक नेटवर्क गायब झाले किंवा 'नो सर्व्हिस' (No Service) दिसलं, तर अशा परिस्थितीत तत्काळ निर्णय घ्या. दुसऱ्या फोनवरून कस्टमर केअर आणि बँकेला कॉल करून सिम लॉक/रिव्हर्सल आणि खातं फ्रीज करून घ्या. यानंतर, नवीन डिव्हाइसवरून ईमेल आणि बँक ॲप्सचे पासवर्ड बदला, कारण ईमेल अकाऊंट सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.
सिम स्वॅप फ्रॉड झाल्यास काय कराल?
जर तुमच्यासोबत फ्रॉड झाल्यास, सायबरक्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवा आणि दूरसंचार कंपन्या व बँकेची सर्व कागदपत्रं पुरावा म्हणून ठेवा. अनेक प्रकरणांमध्ये, तपास यंत्रणा दूरसंचार आणि बँकेची चूक सिद्ध झाल्यास दिलासा देखील देतात.
