Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी वधारली

चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी वधारली

Silver rate : इंग्लंडमधील नवीन विषाणूचा पुन्हा बाजारपेठेवर परिणाम होणार अशा शक्यतेने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असलेल्या सोने-चांदीच्या दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 01:50 IST2020-12-26T01:47:19+5:302020-12-26T01:50:01+5:30

Silver rate : इंग्लंडमधील नवीन विषाणूचा पुन्हा बाजारपेठेवर परिणाम होणार अशा शक्यतेने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असलेल्या सोने-चांदीच्या दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.

Silver rose again by a thousand rupees | चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी वधारली

चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी वधारली

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असून दोन दिवसांपूर्वी तीन हजार रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या दरात शुक्रवारी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर तर सोन्याच्याही दरात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर पोहचले.
इंग्लंडमधील नवीन विषाणूचा पुन्हा बाजारपेठेवर परिणाम होणार अशा शक्यतेने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असलेल्या सोने-चांदीच्या दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. तसेच सट्टा बाजारातही सतत खरेदी-विक्री कमी जास्त प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे चांदीला पुन्हा झळाळी येणार आहे. 

चढ-उतार कायम
२३ डिसेंबर रोजी तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ६७ हजार ५०० रुपयांवर आलेल्या चांदीच्या दरात शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली.  २३ डिसेंबर रोजी ३०० रुपयांनी घसरण होऊन ५० हजार ७०० रुपयांवर आलेल्या सोन्याच्याही दरात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ९०० रुपयांवर पोहोचले.

Web Title: Silver rose again by a thousand rupees

टॅग्स :Silverचांदी