'Rich Dad Poor Dad' चे प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूक सल्लागार रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांनाचांदी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जुलैमध्ये चांदीच्या किमती वेगाने वाढणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून 'योग्य नफा कमावण्याची वेळ खरेदी करताना असते, विक्री करताना नाही,' असं म्हटलंय. कियोसाकी यांनी चांदीचे वर्णन 'आजचं सर्वोत्तम असिमेट्रिक बाय' असं केलंय, म्हणजेच अशी गुंतवणूक ज्यामध्ये कमी तोटा आणि जास्त नफा मिळण्याची शक्यता असते. 'आज प्रत्येकजण चांदी खरेदी करू शकतो, परंतु उद्या ही संधी नसेल,' असंही ते म्हणाले.
सोन्या-चांदीचे दर घसरले
कियोसाकी हे चांदीच्या भविष्याबद्दल बरेच आशावादी असले तरी, सध्या त्याचा परिणाम बाजारात उलटा दिसून येत आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीमुळे भू-राजकीय तणाव कमी झाला आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदी (जुलै डिलिव्हरी) मागील दिवसाची किंमत १,०६,७५५ रुपये प्रति किलो आहे. नवीन किंमत १,०६,६२९ रुपये प्रति किलो आहे. दिवसाची नीचांकी किंमत १,०६,१०९ रुपये प्रति किलो आहे.
१२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
एमसीएक्सवर सोन्याची (ऑगस्ट डिलिव्हरी) किंमत ९६,२६१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दिवसाची नीचांकी किंमत ९५,९५४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर सकाळच्या सुमारास याची किंमत ९६,१०० रुपये होती, म्हणजेच ९८७ रुपयांची घसरण. येथे नमूद केलेल्या दोन्ही किमती मागील दिवसाच्या आहेत.
REMINDER: Rich Lesson:
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) June 27, 2025
“Your profits are made when you buy…. Not when you sell.”
Silver is the best “asymmetric buy” today. That means more possible upside gain with little down side risk.
Silver price will explode in July,
Everyone can afford silver today… but not…
जागतिक बाजारावरही परिणाम
आंतरराष्ट्रीय सराफा बाजारातही घसरण दिसून येत आहे. स्पॉट गोल्डची किंमतही ०.४ टक्क्यांनी घसरून ३,३१३.२३ डॉलर प्रति औंस वर आली. तर अमेरिकेतील सोन्याचा वायदा भाव ०.७ टक्क्यांनी घसरून ३,३२५.७० डॉलर प्रति औंस झाला. स्पॉट सिल्व्हरबद्दल बोलायचं झालं तर ते ३६.६३ डॉलर प्रति औंसवर स्थिर होतं.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहेत. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)