Gold Silver Price 13 May: आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज १३ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६६ रुपये प्रति १० ग्रॅम ने वाढून ९३,९४२ रुपये झाला. तर, चांदी २२५५ रुपयांनी वधारून ९६,३५० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.
जीएसटीसोबत किंमत काय?
जीएसटीमुळे आज सोनं ९६,७६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९९,२४० रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे. यंदा सोनं जवळपास १८,२०२ रुपयांनी तर चांदी १०,३३३ रुपयांनी महागली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर होता. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ५१५८ रुपयांनी स्वस्त आहे.
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
२३ कॅरेट ते १४ कॅरेट सोन्याचा भाव
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ८६३ रुपयांनी वाढून ९३,५६६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ७९३ रुपयांनी वाढून ८६,०५१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. दागिन्यांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या १८ कॅरेट सोन्याचा भावही ६५० रुपयांनी वाढून ७०,४५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ५०६ रुपयांनी वाढून ५४,९५६ रुपये झाला आहे.
सोमवारी सोन्यात घसरण का झाली?
अमेरिका आणि चीनने एकमेकांवरील शुल्क ३ महिन्यांसाठी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं चिनी वस्तूंवरील शुल्क १४५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आणलं आणि चीननेही अमेरिकी वस्तूंवरील शुल्क १२५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणलं. यामुळे जगभरातील शेअर बाजारात तेजी आली आणि लोकांनी जोखीम घेण्याची तयारी झाली. परिणामी सोन्यासारख्या सुरक्षित वस्तूंची मागणी घटली.