Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदी 'जीएसटी'सह ९९ हजारांवर; आंतरराष्ट्रीय घडामोडी, औद्योगिक क्षेत्रांच्या मागणीमुळे दरवाढ

चांदी 'जीएसटी'सह ९९ हजारांवर; आंतरराष्ट्रीय घडामोडी, औद्योगिक क्षेत्रांच्या मागणीमुळे दरवाढ

१ फेब्रुवारीला जीएसटीविना चांदीचे दर ९४ हजार रुपये होते

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 18, 2025 22:48 IST2025-02-18T22:47:29+5:302025-02-18T22:48:06+5:30

१ फेब्रुवारीला जीएसटीविना चांदीचे दर ९४ हजार रुपये होते

Silver at 99 thousand with GST; Prices increase due to international developments, demand from industrial sectors | चांदी 'जीएसटी'सह ९९ हजारांवर; आंतरराष्ट्रीय घडामोडी, औद्योगिक क्षेत्रांच्या मागणीमुळे दरवाढ

चांदी 'जीएसटी'सह ९९ हजारांवर; आंतरराष्ट्रीय घडामोडी, औद्योगिक क्षेत्रांच्या मागणीमुळे दरवाढ

नागपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि औद्योगिक क्षेत्रांकडून मागणी वाढल्याने देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारात चांदीचे दर पुन्हा एकदा विक्रमी स्तरावर पोहोचले. नागपुरात जीएसटीविना प्रति किलो शुद्ध चांदीचे दर ९७,००० रुपये आणि ३ टक्के जीएसटीसह ९९,९१० रुपयांवर पोहोचले. लवकरच लाखावर जाण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.

१ फेब्रुवारीला जीएसटीविना चांदीचे दर ९४ हजार रुपये होते. ३ रोजी एक हजाराची वाढ झाली. ५ रोजी दर ९६,६०० रुपयांवर पोहोचले. १० रोजी ९६,५०० रुपयांवर स्थिरावले. ११ रोजी २,५०० रुपयांची घसरण होऊन दर ९४ हजारांपर्यंत खाली आले. १२ रोजी १,४०० रुपये आणि १३ रोजी १,२०० रुपयांची वाढ होऊन दरपातळी ९६,६०० रुपयांवर पोहोचली. सोमवार, १७ रोजी चांदीचे दर शनिवारएवढेच ९६,५०० रुपयांवर स्थिर होते. मात्र, मंगळवार, १८ रोजी दर ५०० रुपयांनी वाढून ९७ हजारांवर पोहोचले. नागपुरात सराफांकडे प्रति किलो चांदी ३ टक्के जीएसटीसह ९९,९१० रुपयांत विकल्या गेली. याआधी चांदीने लाख रुपये दराचा आकडा गाठला होता.

Web Title: Silver at 99 thousand with GST; Prices increase due to international developments, demand from industrial sectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Silverचांदी