वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नियम कडक केल्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या एच-१ बी व्हिसा अर्जात लक्षणीय घट झाली आहे. विदेशी नागरिक अमेरिकेत येण्यास आता फारसे उत्सुक नसल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.
सॅन फ्रान्सिस्को कॉनिकल्सने ही माहिती दिली आहे. वृत्तपत्राच्या एडिटोरिअल बोर्डाने म्हटले की, एच-१ बी व्हिसाच्या कठोर नियमांची नवी व्यवस्था अनेक वर्षे चालेल, असे अर्जदारांना वाटत आहे. याचा अर्जदार आणि कंपन्या या दोघांनाही फटका बसला आहे.
भारतीय सल्लागार संस्थांकडून एच-१बी व्हिसासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले जात होते. यंदा मात्र, त्यांच्या अर्जांत नाट्यमयरीत्या घट झाली आहे. विदेशी नागरिक आता अमेरिकेत उडी घ्यायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.
चालू वित्त वर्षात एच-१बी व्हिसासाठी १,९९,000 अर्ज प्राप्त झाले. २0१७ मध्ये ही संख्या २,३६,000 इतकी होती.
येत्या १ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २0१९ या वित्तवर्षासाठी एच-१बी व्हिसा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आज सुरू झाली. अमेरिकी नागरिकत्व आणि आव्रजन सेवा या केंद्रीय संस्थेने व्हिसा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. यंदा व्हिसा अर्जात किरकोळ चुकाही सहन केल्या जाणार नसल्याचे ‘यूएससीआयएस’ने या आधीच स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)
गुणवत्ताच महत्त्वाची
काँग्रेसने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने व्हिसा मंजूर करण्याची पद्धती आजपर्यंत वापरली जात होती.
यंदाही या पद्धतीचा अवलंब होईल का, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण ‘यूएससीआयएस’ने दिलेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉटरी पद्धतीला आपल्या निवडणूक प्रचाराच्या काळापासून विरोध चालविला आहे. लॉटरीमुळे गुणवत्ता बाजूला पडते, असे त्यांचे म्हणणे आहे.
एच-१ बी व्हिसा अर्जात यंदा लक्षणीय घट, कडक नियमांचा भारतीय कंपन्यांना फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नियम कडक केल्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या एच-१ बी व्हिसा अर्जात लक्षणीय घट झाली आहे. विदेशी नागरिक अमेरिकेत येण्यास आता फारसे उत्सुक नसल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:56 IST2018-04-04T00:56:03+5:302018-04-04T00:56:03+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नियम कडक केल्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या एच-१ बी व्हिसा अर्जात लक्षणीय घट झाली आहे. विदेशी नागरिक अमेरिकेत येण्यास आता फारसे उत्सुक नसल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.
