Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाईक खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घ्यावं की Two Wheeler लोन; कशात आहे फायदा?

बाईक खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घ्यावं की Two Wheeler लोन; कशात आहे फायदा?

Personal Loan vs. Two Wheeler Loan: आजकाल टू व्हीलर लोनची मागणी झपाट्यानं वाढली आहे. बहुतांश तरुण आपला छंद पूर्ण करण्यासाठी महागड्या दुचाकी खरेदी करत आहेत. त्यासाठी ते बँकांकडून कर्ज घेतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 10:27 IST2025-02-15T10:26:03+5:302025-02-15T10:27:37+5:30

Personal Loan vs. Two Wheeler Loan: आजकाल टू व्हीलर लोनची मागणी झपाट्यानं वाढली आहे. बहुतांश तरुण आपला छंद पूर्ण करण्यासाठी महागड्या दुचाकी खरेदी करत आहेत. त्यासाठी ते बँकांकडून कर्ज घेतात.

Should you take a personal loan or a two wheeler loan to buy a bike what is the advantage | बाईक खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घ्यावं की Two Wheeler लोन; कशात आहे फायदा?

बाईक खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घ्यावं की Two Wheeler लोन; कशात आहे फायदा?

Personal Loan vs. Two Wheeler Loan: आजकाल टू व्हीलर लोनची मागणी झपाट्यानं वाढली आहे. बहुतांश तरुण आपला छंद पूर्ण करण्यासाठी महागड्या दुचाकी खरेदी करत आहेत. त्यासाठी ते बँकांकडून कर्ज घेतात. बहुतांश कर्जदार नोकरदार असल्यानं बँकाही सहज कर्ज देतात. आता बाईक खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घेणं किंवा टू व्हीलर लोन घेणं योग्य आहे का, असा प्रश्न पडतो. तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर शोधत असाल तर देण्याचा प्रयत्न करूया. यानंतर तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल.

पर्सनल लोन

पर्सनल लोन तुम्हाला अनेक कारणांसाठी तुमच्या पैशांची गरज पूर्ण करतं. बँका पर्सनल लोन सहज देतात. मात्र, यावरील व्याजदर इतर कर्जांपेक्षा अधिक असतो.

पर्सनल लोनची प्रमुख वैशिष्ट्ये

फ्लेक्सिबल: पर्सनल लोनचे पैसे तुम्ही कुठेही वापरू शकता. तुम्ही पैसे कुठे खर्च कराल, हे बँका विचारत नाहीत. त्यातून तुम्ही बाईकही सहज खरेदी करू शकता.
कर्जाची रक्कम: कर्जाची रक्कम लेंडर्सनं घालून दिलेल्या अटींनुसार आपलं उत्पन्न आणि आपल्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते.
गॅरंटीची गरज नाही: पर्सनल लोनमध्ये तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नसते.
व्याजदर: बँका पर्सनल लोनवर वार्षिक १०.५० ते २४ टक्के व्याज आकारतात.

टू व्हीलर लोन

बँका दुचाकी खरेदीसाठी हे कर्ज देतात. हे लोन सुरक्षित असल्यामुळे त्याचे व्याजदर पर्सनल लोनपेक्षा कमी असतात.

टू-व्हीलर लोनची प्रमुख वैशिष्ट्ये

कर्जाची रक्कम: कर्जदार सामान्यत: बाईकच्या किंमतीच्या ८०% ते ९०% पर्यंत कर्ज देतात.
व्याजदर: वैयक्तिक कर्जापेक्षा व्याजदर कमी असतात.
पात्रता: टू व्हीलर लोन देण्यापूर्वी बँका प्रथम आपलं मासिक उत्पन्न आणि जॉब सिक्युरिटी तसंच आपला क्रेडिट स्कोअर तपासतात.

काय आहे बेस्ट?

ज्यांना कमी व्याजदरानं सुरक्षित कर्ज हवं आहे, त्यांनी टू व्हीलर लोन घ्यावं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पर्सनल लोन घेण्याचा फायदा त्याच्या फ्लेक्सिबलिटीमध्ये आहे कारण यात तुम्ही थोडी अधिक रक्कम घेऊ शकता. त्याचबरोबर टू व्हीलर लोनच्या परतफेडीचा कालावधी कमी असतो. दुसरीकडे, पर्सनल लोनच्या परतफेडीचा कालावधी अधिक असतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी व्यक्तीचं प्राधान्य आणि इतर बाबींवर अवलंबून दुचाकी खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घ्यायचे की टू-व्हीलर लोन घ्यायचे हे बऱ्याच अंशी अवलंबून असतं. सर्वप्रथम, या दोन पर्यायांपैकी एक निवडण्यासाठी पात्रतेवर आधारित व्याज दर, अटी, शुल्क आणि निर्बंधांची तुलना करणं आवश्यक असतं.

Web Title: Should you take a personal loan or a two wheeler loan to buy a bike what is the advantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक