Lokmat Money > बिझनेस न्यूज > धक्कादायक! झटपट पैसे कमावणे, श्रीमंतीच्या हव्यासामुळे ५ अब्ज जण बेटिंगच्या जाळ्यात

धक्कादायक! झटपट पैसे कमावणे, श्रीमंतीच्या हव्यासामुळे ५ अब्ज जण बेटिंगच्या जाळ्यात

मोठ्या रकमेच्या प्रलोभन दाखवून अल्पवयीन, दुर्बल समूहातील तरुणांची लुबाडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:16 IST2025-06-02T14:16:13+5:302025-06-02T14:16:59+5:30

मोठ्या रकमेच्या प्रलोभन दाखवून अल्पवयीन, दुर्बल समूहातील तरुणांची लुबाडणूक

Shocking! 5 billion people are trapped in betting due to the desire to make quick money and get rich | धक्कादायक! झटपट पैसे कमावणे, श्रीमंतीच्या हव्यासामुळे ५ अब्ज जण बेटिंगच्या जाळ्यात

धक्कादायक! झटपट पैसे कमावणे, श्रीमंतीच्या हव्यासामुळे ५ अब्ज जण बेटिंगच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अवैध सट्टेबाजी प्लॅटफॉर्मवर मोठ्या रकमेच्या आमिषांमुळे अल्पवयीन तरुण-तरुणी तसेच दुर्बल घटकांमधील नागरिक लुबाडणुकीच्या जाळ्यात खेचले जात आहेत. सीयूटीएस इंटरनॅशनलने जारी केलेल्या ‘फिक्सिंग द ऑड्स : ए पॉलिसी ब्लूप्रिंट फॉर कर्बिंग इलिगल ऑनलाइन गॅम्बलिंग इन इंडिया’ या अहवालानुसार अवैध जुगार चालवणारे नियमांतील पळवाटांचा गैरफायदा घेत लुबाडणूक करीत आहेत.

एका वर्षात १५ अवैध जुगार प्लॅटफॉर्म आणि त्यांच्याप्रमाणे असणाऱ्या इतर साइटस्वर ५.४ अब्जांहून अधिकजण लॉग-इन झाले आहेत. यावरून झटपट पैशांच्या आमिषाला आहारी जाणाऱ्यांचे प्रमाण किती गंभीर आहे, हे दिसून येते. नियमांचे बंधन नसल्याने या प्लॅटफॉर्मवर तरुणांना कल्पनेच्या पलीकडची आश्वासने, ऑफर्स दिल्या जातात. 

१०० अब्ज डॉलर्सची उलाढाल

आक्रमक आर्थिक प्रोत्साहन आणि रॅपिड-फायर सट्टेबाजी उत्पादने अल्पवयीन आणि दुर्बल घटकांतील तरुणांना अभूतपूर्व वेगाने उच्च जोखमीच्या जुगारात खेचले जात आहे. लोक या सट्टेबाजीच्या आहारी जात आहेत. अहवालात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे की, देशभरातील या अवैध प्लॅटफॉर्मवर दरवर्षाला जवळपास १०० अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असेल.

२,००० बँक खात्यांवर सरकारने घातली बंदी

  • मार्च २०२५ मध्ये प्लॅटफॉर्मवरील युजर्सचे प्रमाण अमेझॉन, विकिपीडिया, एक्स, क्वोरा, रेडिटसारख्या प्लॅटफॉर्मपेक्षाही अधिक आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या दरम्यान एकूण ट्रॅफिकपैकी ६६ टक्क्यांहून अधिक (३.५ अब्जांहून अधिक भेटी) थेट ट्रॅफिकद्वारे झाल्या. युजर्स युआरएल मॅन्युअली टाकतात किंवा खासगी चॅनेलवरून लिंक कॉपी करत आहेत.
  • वित्त मंत्रालयाने २२ मार्च २०२५ रोजी परदेशी ऑनलाइन युनिटस्विरोधात कडक कारवाई जाहीर केली. यांतील सुमारे ७०० युनिटस्ची चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंत ३५७ अवैध किंवा नियमभंग करणाऱ्या वेबसाइट्स/यूआरएल्स ब्लॉक केल्या आहेत. सुमारे २,००० बँक खात्यांवरही बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Shocking! 5 billion people are trapped in betting due to the desire to make quick money and get rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.