अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला डेड इकोनॉमी असे संबोधून भारतावर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. मात्र, ट्रम्प यांच्या या वक्तव्याला अमेरिकेतीलच टेक कंपन्यांनी त्यांच्या विक्रमी गुंतवणुकीतून मोठे आव्हान दिले. मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, गुगल आणि ओपनएआयसह अनेक दिग्गज कंपन्यांनी भारतात कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करत भारतीय बाजारावर आणि भविष्यावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला.
अमेरिकन टेक कंपन्यांची ही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक स्पष्टपणे दर्शवते की, भारताची अर्थव्यवस्था डेड इकोनॉमी नसून, ती अत्यंत वेगाने वाढणारी, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि भविष्यातील जागतिक तंत्रज्ञानाचे केंद्र बनण्याची क्षमता असलेली अर्थव्यवस्था आहे.
मायक्रोसॉफ्टपासून ते अमेझॉन, गुगल आणि ओपनएआय पर्यंतच्या कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी भारतात १७.५ अब्ज डॉलर्स (₹१.५७ लाख कोटी) गुंतवणुकीची घोषणा केली, ज्यामुळे भारताचा एआय बाजार वाढेल. अमेझॉनची ही मोठी गुंतवणूक मायक्रोसॉफ्टने १० डिसेंबर रोजी भारतात मोठी गुंतवणूक जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आली.
अॅमेझॉन २०३० पर्यंत भारतात ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. अॅमेझॉन कंपनी एआय आणि लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. शिवाय, मायक्रोसॉफ्ट आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान मोदींशी भेट घेतल्यानंतर सत्या नाडेला म्हणाले की, "मायक्रोसॉफ्टने २०२९ पर्यंत १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. कंपनीने सांगितले की, ही गुंतवणूक मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि एआय क्षमतांचा विस्तार करण्यासाठी वापरली जाईल.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला, गुगलने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे मोठ्या प्रमाणात एआय हब बांधण्यासाठी १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली. ही अमेरिकेबाहेर कंपनीची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. या गुंतवणुकीमुळे २०३० पर्यंत १००,००० नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.
कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि भारताच्या एआय फर्स्ट उपक्रमासाठी सकारात्मकता दाखवली. कंपनीने विकासाला गती देण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या. ओपनएआय भारतात स्टारगेटचा एक अध्याय सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी चर्चा करत आहे, असे अहवालांवरून दिसून येते.
