Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एसी रेस्टॉरंटस्मध्येच सेवाकर लागू होणार

एसी रेस्टॉरंटस्मध्येच सेवाकर लागू होणार

वातानुकुलनाची सोय (एअर कंडिशनर) नसलेल्या उपाहारगृहांमध्ये ग्राहकांना सेवाकर लागू होणार नाही.

By admin | Updated: June 9, 2015 23:27 IST2015-06-09T23:27:52+5:302015-06-09T23:27:52+5:30

वातानुकुलनाची सोय (एअर कंडिशनर) नसलेल्या उपाहारगृहांमध्ये ग्राहकांना सेवाकर लागू होणार नाही.

Service tax will be applicable only at AC restaurants | एसी रेस्टॉरंटस्मध्येच सेवाकर लागू होणार

एसी रेस्टॉरंटस्मध्येच सेवाकर लागू होणार

नवी दिल्ली : वातानुकुलनाची सोय (एअर कंडिशनर) नसलेल्या उपाहारगृहांमध्ये ग्राहकांना सेवाकर लागू होणार नाही व एअर कंडिशनिंग असल्यास एकूण बिलाच्या केवळ ४० टक्के रकमेवर हा कर द्यावा लागेल, असे अर्थमंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.
एअर कंडिशनिंग किंवा सेंट्रल हिटिंग सिस्टीम नसलेल्या रेस्टॉरंटस्, खाद्यपदार्थ केंद्र किंवा खाणावळींना सेवाकरातून वगळण्यात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर एअर कंडिशनिंग किंवा सेंट्रल हिटिंग सिस्टीमच्या रेस्टॉरंटस्मध्येच सेवाकर द्यावा लागेल, असे अर्थमंत्रालयाने सेवाकराबद्दल स्पष्टीकरण केले. एअर कंडिशनिंग व सेंट्रल हिटिंग रेस्टॉरंटस्मध्ये ग्राहकाच्या एकूण बिलाच्या केवळ ४० टक्के रकमेवरच सेवाकर आकारला जाईल. एक जूनपासून हा सेवा कर १४ टक्के झाला आहे.

 

Web Title: Service tax will be applicable only at AC restaurants