Lokmat Money > बिझनेस न्यूज > Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान

Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान

SBI Alert: भारतातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) ग्राहकांना एक इशारा दिलाय. बँकेनं यासंदर्भात एक व्हिडीओही शेअर केलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:38 IST2025-06-02T14:37:37+5:302025-06-02T14:38:24+5:30

SBI Alert: भारतातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) ग्राहकांना एक इशारा दिलाय. बँकेनं यासंदर्भात एक व्हिडीओही शेअर केलाय.

sbi warns whatsapp users if you dont pay attention to this you will suffer huge losses shared video | Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान

Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान

SBI Alert: भारतातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) ग्राहकांना एक इशारा दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये, काही फसवणूक करणारे त्यांचं नाव आणि लोगोचा गैरवापर करून लोकांना फसवत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे फसवणूक करणारे सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खोट्या जाहिराती दाखवतात, ज्यामध्ये SBI कडून शेअर बाजारातील टिप्स किंवा गुंतवणूक सल्ला दिला जात असल्याच्या दावा केला जात असल्याचं त्यांनी नमूद केलंय.

'या' बँकेनं ग्राहकांना दिली गूड न्यूज; आता बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्सचं टेन्शनच नाही, तुमचं अकाऊंट आहे का?

अशा प्रकारे होते फसवणूक

या फसवणूक करणाऱ्यांची कार्यपद्धती सोपी आहे. ते एसबीआयचं नाव आणि लोगो असलेले बनावट प्रोफाइल तयार करतात. ते जाहिरातींमध्ये अशक्य परतावा देण्याचं खोटं आश्वासन देतात. जसे की, "तुम्ही तुमचे पैसे फक्त ७ दिवसांत दुप्पट होतील." ते लोकांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड होण्यासही सांगतात जिथे ते "मोफत" शेअर टिप्स देण्याचाही दावा करतात. "आम्ही अशक्य परताव्याचं आश्वासन देणाऱ्या अशा कोणत्याही टिप्स देत नाही किंवा अशा कोणत्याही स्कीम चालवत नाही. ना आम्ही कोणाला असं करण्याची परवानागी देता," असं एसबीआयं म्हटलंय.

काय दिला सल्ला?

  • संशयानं पाहा : एसबीआयच्या नावानं एखाद्या जाहिरातीत अशक्य परताव्याचं आश्वासन दिलं जात असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका.
  • एसबीआयकडून आलेल्या कोणत्याही मेसेजची पुष्टी करण्यासाठी, जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (https://bank.sbi)(https://bank.sbi).
  • कोणतीही संशयास्पद जाहिरात किंवा मेसेज आल्यास एसबीआय किंवा संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कळवा.
  • कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी एसबीआयच्या अधिकृत चॅनेल्स (वेबसाइट, अॅप, शाखा) मधूनच माहिती घ्या.
  • एसबीआयसारख्या मोठ्या बँका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून कधीही 'फ्री टिप्स' किंवा 'मॅजिक रिटर्न' देत नाहीत. जर कोणी असा दावा करताना दिसत असेल तर तो फसवा आहे हे समजून घ्या. सावध राहा, सतर्क राहा.

Web Title: sbi warns whatsapp users if you dont pay attention to this you will suffer huge losses shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.