Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI नं नवी मुंबईत भाड्यानं घेतलं ऑफिस; महिन्याचं रेंट १.६८ कोटी, पाहा डिटेल्स

SBI नं नवी मुंबईत भाड्यानं घेतलं ऑफिस; महिन्याचं रेंट १.६८ कोटी, पाहा डिटेल्स

SBI Bank Lease Details: पाहा नवी मुंबईत कुठे घेतली स्टेट बँकेनं ही जागा. यापूर्वी एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडनं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये १०३ कोटी रुपयांना दोन कमर्शियल ऑफिस युनिट्स खरेदी केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 09:18 IST2026-02-28T09:18:40+5:302026-02-28T09:18:40+5:30

SBI Bank Lease Details: पाहा नवी मुंबईत कुठे घेतली स्टेट बँकेनं ही जागा. यापूर्वी एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडनं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये १०३ कोटी रुपयांना दोन कमर्शियल ऑफिस युनिट्स खरेदी केले होते.

SBI rents office in Navi Mumbai Monthly rent is Rs 1 68 crore check property details | SBI नं नवी मुंबईत भाड्यानं घेतलं ऑफिस; महिन्याचं रेंट १.६८ कोटी, पाहा डिटेल्स

SBI नं नवी मुंबईत भाड्यानं घेतलं ऑफिस; महिन्याचं रेंट १.६८ कोटी, पाहा डिटेल्स

SBI Bank Lease Details: भारतीय स्टेट बँकेनं (SBI) नवी मुंबईतील ऐरोली येथे १.३४ लाख स्क्वेअर फूट जागा दरमहा १.६८ कोटी रुपये भाड्यानं घेतली आहे. बँकेच्या 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर'साठी (GCC) ही जागा पाच वर्षांच्या लीज करारावर घेण्यात आली असून, प्रॉपस्टॅकच्या कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे. 

स्टेट बँक ग्लोबल आयटी सेंटरनं नेवा भक्ती नॉलेज सिटीमधील तळमजला आणि चौथ्या ते नवव्या मजल्यापर्यंतची जागा नेवा टेक्नोसिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून भाड्यानं घेतली आहे. या जागेचं मूळ भाडं आणि फिट-आउट खर्च मिळून एकूण मासिक भाडं १.६८ कोटी रुपये इतकं होतं.

नूतनीकरणावर १५% भाडेवाढ

करारानुसार, पाच वर्षांनंतर लीजचं नूतनीकरण केल्यास भाड्यात १५% वाढीचा समावेश असेल. या व्यवहारासाठी बँकेने १०.११ कोटी रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट जमा केली आहे. प्रॉपस्टॅकचे सह-संस्थापक राजा सीतारामन यांनी सांगितलं की, "एसबीआयनं १.३४ लाख चौरस फूट जागा लीजवर घेणं हे दर्शवतं की, 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स'साठी ऐरोलीला पसंती दिली जात आहे. डिजिटल बँकिंग ऑपरेशन्ससाठी उच्च दर्जाच्या आयटी पायाभूत सुविधांची असलेली मजबूत मागणी यातून दिसून येते. हा व्यवहार संस्थात्मक भाडेकरू तंत्रज्ञानविषयक गरजांसाठी तयार असलेल्या जागेला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट करतो."

१०३ कोटींमध्ये खरेदी केल्या दोन ऑफिस युनिट्स

नोंदणी कागदपत्रांनुसार, २०२४ मध्ये एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडनं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये १०३ कोटी रुपयांना दोन कमर्शियल ऑफिस युनिट्स खरेदी केले. १५,१७६ चौरस फूट कारपेट एरिया असलेल्या या जागा ६७,८७० रुपये प्रति चौरस फूट दरानं खरेदी करण्यात आल्या आहेत. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट ही पेन्शन फंड, म्युच्युअल फंड आणि ईटीएफ व्यवस्थापन करणारी कंपनी आहे.

बच्चन कुटुंबाचा बंगला आणि विप्रोचा व्यवहार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२१ मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मुंबईच्या जुहू येथील 'वत्स' आणि 'अम्मू' बंगल्यांचा तळमजला स्टेट बँकेला १५ वर्षांसाठी १८.९ लाख रुपये मासिक भाड्यानं दिला होता. तसंच, डिसेंबर २०२५ मध्ये आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडने ऐरोलीतील माइंडस्पेस बिझनेस पार्क्समध्ये १.४५ लाख चौरस फूट व्यावसायिक जागा पाच वर्षांसाठी ६१ कोटी रुपयांहून अधिक एकूण भाड्यानं लीजवर घेतली होती.

Web Title : एसबीआई ने नवी मुंबई में ₹1.68 करोड़ मासिक किराए पर कार्यालय लिया

Web Summary : एसबीआई ने नवी मुंबई में अपने ग्लोबल कैपेबिलिटी सेंटर के लिए 1.34 लाख वर्ग फुट जगह ₹1.68 करोड़ मासिक किराए पर ली। नवीनीकरण में 15% की वृद्धि शामिल है। एसबीआई ने बीकेसी में ₹103 करोड़ में दो कार्यालय इकाइयां भी खरीदीं।

Web Title : SBI Leases Navi Mumbai Office for ₹1.68 Crore Monthly Rent

Web Summary : SBI leased 1.34 lakh sq ft in Navi Mumbai for its Global Capability Center at ₹1.68 crore monthly rent for five years. Renewal includes a 15% increase. SBI also bought two BKC office units for ₹103 crore.