भारतीय स्टेट बँकेला (SBI) ग्लोबल फायनान्स, न्यूयॉर्कतर्फे दोन मोठे पुरस्कार मिळाले आहेत. वर्ल्ड बँक/आयएमएफ वार्षिक बैठक २०२५ दरम्यान आयोजित ग्लोबल फायनान्स अवॉर्ड समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. एसबीआयला 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक २०२५' आणि 'बेस्ट बँक इन इंडिया २०२५' पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, या सन्मानांमुळे जागतिक बँकिंग लीडर म्हणून एसबीआयची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. बँक इनोव्हेशन, फायनान्शिअल इनक्लुजन आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतीय स्टेट बँकेनं हे देखील सांगितलंय की, हे पुरस्कार ग्राहकांना जागतिक दर्जाचा बँकिंग अनुभव देण्यात एसबीआयचे यश दर्शवतात. त्याचबरोबर, बँकेनं तंत्रज्ञानामध्ये आपलं नेतृत्व कायम ठेवलं आहे आणि संपूर्ण भारतात आपल्या सेवांचा विस्तार केला आहे.
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
बँकेचे ५२ कोटी ग्राहक
एसबीआयचे समूह अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली, "ग्लोबल फायनान्सने एसबीआयच्या उत्कृष्टतेप्रती असलेल्या आमच्या दैनंदिन वचनबद्धतेला मान्यता दिल्याबद्दल आम्हाला खूप सन्मानित वाटत आहे," असं ते म्हणाले. "५२ कोटी ग्राहकांना सेवा देणं आणि दररोज ६५,००० नवीन ग्राहक जोडण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनमध्ये मोठ्या गुंतवणुकीची मागणी आहे. एक 'डिजिटल फर्स्ट, कन्झ्युमर फर्स्ट' बँक म्हणून, आमचं प्रमुख मोबाइल ॲप्लिकेशन १० कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देतं, ज्यात १ कोटी दैनिक सक्रिय युजर्स आहेत आहेत." असंही सेट्टी यांनी स्पष्ट केलं.
World's Best Consumer Bank & Best Bank in India, @TheOfficialSBI 🇮🇳
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 23, 2025
Proud to see our very own State Bank of India honoured with two prestigious titles by Global Finance, New York, at the 2025 Best Bank Awards Ceremony for its outstanding service & customer trust worldwide.… pic.twitter.com/JqT5gD4LZG
देशातील सर्वात मोठी बँक
एसबीआय भारतातील सर्वात मोठी बँक आहे. ती मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत आघाडीवर आहे. ही देशातील सर्वात मोठी गृह कर्ज देणाऱ्या बँकांपैकी एक आहे. एसबीआयने आतापर्यंत सुमारे ३० लाख भारतीय कुटुंबांचे घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
