Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?

SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?

SBI Home/Car Loan Interest Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना व्याजदर कपातीची मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 09:54 IST2025-12-13T09:52:38+5:302025-12-13T09:54:55+5:30

SBI Home/Car Loan Interest Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना व्याजदर कपातीची मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

SBI gives good news to customers car home personal Loan interest rates reduced How much will you save in 20 years on 50 lakhs | SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?

SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?

SBI Home/Car Loan Interest Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या ग्राहकांना व्याजदर कपातीची (Rate Cut) मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केल्यानंतर, आता एसबीआयनं देखील आपल्या कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

बँकेने कर्जाच्या दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वात मोठ्या बँकेने सर्व कालावधीसाठीचा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ५ बेसिस पॉईंट्सनं कमी केला आहे. या कपातीनंतर MCLR ८.७५% वरून ८.७०% झाला आहे.

काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती

SBI चं कर्ज झालं स्वस्त

एसबीआयनं बेंचमार्क लिंक्ड रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. हे नवीन दर १५ डिसेंबर २०२५ पासून लागू होतील. यानंतर एक्सटर्नल बेंचमार्क-लिंक्ड रेट (EBLR) ७.९०% होईल. सध्या बँकेत कर्जाची सुरुवात ८.१५% ने होते, जी १५ डिसेंबरनंतर ८% पेक्षाही कमी होईल.

RBI ने चौथ्यांदा केले व्याजदर कमी

या वर्षी आरबीआयने चौथ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आर्थिक विकासाला चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. आरबीआयनं नुकतीच दरकपात केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जाचे दर कमी करण्यास सुरुवात केली आहे आणि एसबीआयचे ग्राहक देखील या कपातीची वाट पाहत होते.

SBI च्या FD दरांमध्येही बदल

व्याजदरांमध्ये कपात केल्यानंतर, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने मुदत ठेवीच्या (Fixed Deposit) व्याजदरातही बदल केला आहे. २ ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी व्याजदर ६.४०% झाले आहेत. याशिवाय, ४४४ दिवसांच्या (अमृत वृष्टी) योजनेचे व्याजदर ६.६०% वरून कमी होऊन ६.४५% झाले आहेत. इतर मॅच्युरिटी असलेल्या एफडीच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

कोणाला होणार फायदा?

या दर कपातीचा थेट फायदा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. जसं की, पर्सनल लोन, वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता कमी व्याज भरावं लागेल. म्हणजेच, आता कर्जाचा ईएमआय (EMI) कमी होईल.

उदाहरणासह समजून घ्या

जर तुम्ही एसबीआयमधून २० वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतलं असेल किंवा घेण्याची योजना करत असाल, तर आता तुम्हाला ईएमआयमध्ये कमी व्याज द्यावं लागेल. पूर्वी व्याजदर ८.१५% होता, तो आता कमी होऊन ७.९०% च्या आसपास झाला आहे. याचा अर्थ, आता तुमच्या मासिक ईएमआयमध्ये ७५० रुपयांहून अधिक कपात होईल. संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास तुमचे सुमारे ९००० रुपये वाचतील. २० वर्षांच्या दीर्घ मुदतीत तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत.

Web Title : एसबीआई ने घटाई ब्याज दरें: ग्राहकों के लिए खुशखबरी!

Web Summary : आरबीआई की रेपो दर में कटौती के बाद एसबीआई ने ऋण दरों में कमी की है। इससे होम, कार और पर्सनल लोन ग्राहकों को फायदा होगा, ईएमआई कम होगी। 20 साल के लिए 50 लाख रुपये के होम लोन पर अब 750 रुपये से ज्यादा की मासिक बचत होगी।

Web Title : SBI Slashes Loan Interest Rates: Good News for Customers!

Web Summary : SBI reduced lending rates following RBI's repo rate cut. This benefits home, car, and personal loan customers, lowering EMIs. A ₹50 lakh home loan for 20 years will now save over ₹750 monthly.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.