State Bank Of India: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं आपल्या ग्राहकांसाठी एक अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची माहिती जारी केली आहे. देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता एसबीआयनं (State Bank Of India) ही महत्त्वाची माहिती जारी केली आहे, जेणेकरून ग्राहक सायबर फसवणुकीपासून सावध आणि सुरक्षित राहू शकतील. स्टेट बँक ऑफ इंडियानं माहिती दिली की त्यांचे संपर्क केंद्र ग्राहकांना फक्त दोन सीरिजच्या क्रमांकावरून कॉल करतात. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
केवळ या नंबरवरुन येतो कॉल
स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. एसबीआयनं या पोस्टमध्ये त्यांचं कॉन्टॅक्ट सेंटर फक्त १६०० आणि १४० ने सुरू होणाऱ्या नंबरवरून कॉल करतं. जर तुम्हाला १६०० किंवा १४० ने सुरू होणारा नंबर आला तर समजून घ्या की तो एसबीआयच्या अधिकृत कॉन्टॅक्ट सेंटरवरुन कॉल आहे. जर तुम्हाला या दोन नंबर व्यतिरिक्त इतर कोणत्याही नंबरवरून कॉल आला आणि कॉलर स्वतःला एसबीआयचा अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून ओळख करून देत असेल तर तुम्हाला सतर्क राहावं लागेल.
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
Our Contact Centre calls only from numbers beginning with 1600 or 140 series.
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 20, 2025
Stay Informed!! Stay Protected!! pic.twitter.com/LW5CbNVbuu
तर १९३० वर कॉल करावा लागेल
स्टेट बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार त्यांचे १० अंकी क्रमांक १६०० XX XXXX आणि १४० XXX XXXX नं सुरू होतात. जर तुम्हाला SBI च्या नावानं इतर कोणत्याही क्रमांकावरून कॉल आला तर तुम्हाला सतर्क राहावं लागेल. लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती जसं की OTP, बँक खातं क्रमांक, पॅन क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम कार्ड पिन शेअर करण्याची गरज नाही. यासोबतच, तुम्हाला कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्याचीही गरज नाही. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याचा बळी पडलात तर विलंब न करता १९३० वर कॉल करा आणि तक्रार नोंदवा.