Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपया १९ पैशांनी घसरून ६३.३0 वर

रुपया १९ पैशांनी घसरून ६३.३0 वर

तेल कंपन्यांकडून डॉलरच्या मागणीला जोर असल्यामुळे शुक्रवारी रुपया १९ पैशांनी घसरला. त्याबरोबर विदेशी चलन विनिमय बाजारात एक डॉलरची किंमत ६३.३0 रुपये झाली आहे.

By admin | Updated: December 20, 2014 00:44 IST2014-12-20T00:44:02+5:302014-12-20T00:44:02+5:30

तेल कंपन्यांकडून डॉलरच्या मागणीला जोर असल्यामुळे शुक्रवारी रुपया १९ पैशांनी घसरला. त्याबरोबर विदेशी चलन विनिमय बाजारात एक डॉलरची किंमत ६३.३0 रुपये झाली आहे.

The rupee fell by 19 paise to 63.30 against the dollar | रुपया १९ पैशांनी घसरून ६३.३0 वर

रुपया १९ पैशांनी घसरून ६३.३0 वर

मुंबई : तेल कंपन्यांकडून डॉलरच्या मागणीला जोर असल्यामुळे शुक्रवारी रुपया १९ पैशांनी घसरला. त्याबरोबर विदेशी चलन विनिमय बाजारात एक डॉलरची किंमत ६३.३0 रुपये झाली आहे.
याच आठवड्यात रुपया ६३.५३ वर जाऊन १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. या पातळीपासून रुपया अवघे काही पैसे दूर आहे. केंद्रीय वित्तपंत्री अरुण जेटली यांनी मात्र चिंता करण्याचे कारण नसल्याचा खुलासा केला आहे. जेटली यांनी संसदेत सांगितले की, रुपयाच्या किमतीबद्दल मला कोणतेही संकट दिसत नाही. काही दिवसांच्या अस्थीरतेनंतर रुपया स्थिर होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या १६ आणि १७ डिसेंबरच्या बैठकीत व्याजदरवाढीचा निर्णय घेतला जाईल, अशी भीती व्यक्त होती. तथापि, तसे काही झाले नाही. रिझर्व्हने दरवाढीची शक्यता फेटाळून लावली. या आठवड्याच्या सुरुवातीला फेडरल रिझर्व्हच्या या कथित भीतीमुळे रुपया घसरला होता.

Web Title: The rupee fell by 19 paise to 63.30 against the dollar