‘रिच डॅड पूअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा बिटकॉइनबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. माणूस गरीब राहण्याचं कारण त्याची बुद्धिमत्ता नाही, तर त्याची भीती आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. २९ ऑक्टोबर रोजी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली. “या वर्षी बिटकॉइनची किंमत दुप्पट होऊ शकते. कदाचित ती २००,००० डॉलरपर्यंतही पोहोचेल,” असं ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की, जे लोक हरतात, त्यांच्यामध्ये भावनांना हाताळण्याची क्षमता कमी असते.
रॉबर्ट कियोसाकी यांनी एक वैयक्तिक अनुभव शेअर केला. कियोसाकी यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या एका मित्राला त्यांचे कॉईनबेस (Coinbase) ॲप दाखवलं, जे “काही वर्षांपूर्वी खूपट खराब होते.” आता त्या अकाउंटमध्ये बिटकॉइनमध्ये कोट्यवधी रुपये आहेत. परंतु, त्यांच्या मित्रानं ही झालेली वाढ पाहिली नाही आणि केवळ हजारांच्या नुकसानीवर लक्ष दिलं. कियोसाकी म्हणतात की, हाच मानसिक आणि भावनिक फरक आहे जो श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गामध्ये खरी भिन्नता निर्माण करतो. यालाच भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात.
“जे लोक हरतात, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी असते. ते भीतीमध्ये जगत असतात. श्रीमंत लोक जाणतात की भीती आणि लालसा या दोन्ही आपल्या भावनांचा भाग आहेत आणि ते या दोघांचाही योग्य वापर करायला जाणतात,” असंही ते म्हणाले. कियोसाकी पुढे म्हणतात की, “ईक्यू, आयक्यू पेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यामुळेच माझ्या गरीब वडिलांसारखे अनेक सुशिक्षित लोकही गरीब राहिले.” म्हणजेच, पैशाच्या जगात भावनिक समजदारी आयक्यू पेक्षाही अधिक महत्त्वाची आहे.
श्रीमंत होण्यासाठी कियोसाकींचा साधा फॉर्म्युला
कियोसाकी बराच काळ सरकारी पैशांवर विश्वास ठेवत नाहीत आणि ते नेहमी बिटकॉइन, सोने आणि चांदीसारख्या मर्यादित प्रमाणात असलेल्या गोष्टींना प्राधान्य देतात. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितलं होतं की, बिटकॉइन खरेदी करण्यास उशीर करू नका, कारण त्याचे आणखी माईन होणारी नाणी कमी झाले असून, एकूण संख्या दोन दशलक्षांपेक्षा (दोन मिलियन) कमी झाली आहे. त्यांनी त्यांच्या अलीकडील पोस्टमध्ये हे देखील म्हटलं आहे. “जर तुम्हाला श्रीमंत आणि आनंदी राहायचे असेल, तर तुमची भावनिक बुद्धिमत्ता मजबूत असायला हवी. याचा अर्थ, तुम्हाला तुमच्या लालसा आणि भीतीवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे.”
WHY LOSERS lose:
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) October 29, 2025
I was showing a friend my coin base app, explaining that a few years ago it was pathetic. Today my app showed my friend I have millions in Bitcoin…. and I think Bitcoin will double in price this year…. Possibly a high of $200k.
Although my coin base showed I…
बिटकॉइनमध्ये किरकोळ चढ-उतारासह स्थिरता
बिटकॉइनची किंमत सध्या स्थिर आहे. आज ते जवळपास १,१३,१२५ डॉलर वर ट्रेड करत होतं. तथापि, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे आणि अमेरिका-चीन व्यापार कराराबद्दल असलेल्या अनिश्चिततेमुळे किमतीत किरकोळ चढ-उतार दिसून आला. मुड्रेक्सचे (Mudrex) सीईओ एडुल पटेल यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत फेडच्या व्याजदर कपातीवर आणि अमेरिका-चीन व्यावसायिक करारावर स्पष्टता येत नाही, तोपर्यंत बिटकॉइन एका विशिष्ट मर्यादेतच राहू शकतो. मात्र, कोणतीही सकारात्मक बातमी आल्यास, खरेदीदार पुन्हा बाजारात सक्रिय होऊ शकतात आणि बिटकॉइन १,१७,४०० डॉलर चा स्तर पार करू शकतो.
(टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
