मुंबई : वित्त वर्ष २०२४-२५ साठी भारतीय रिझर्व्ह बँक भारत सरकार विक्रमी २.६९ लाख कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. वित्त वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत तो २७.४ टक्के जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही घोषणा केली.
वित्त वर्ष २०२३-२४ साठी रिझर्व्ह बँकेने भारत सरकारला २.१ लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. त्याआधी वित्त वर्ष २०२२-२३ मध्ये ही रक्कम ८७,४१६ कोटी रुपये होती. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६१६ व्या बैठकीत लाभांशाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा होते.