लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंजाब अँड सिंध बँकेने मोठ्या थकबाकीदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बँकेने वसुलीसाठी २७,९५५ कोटी रुपयांचे १,३१६ दावे दाखल केले असून, सार्वजनिक क्षेत्रातील ११ बँकांमध्ये या बँकेचा थकबाकीचा वाटा तुलनेने सर्वात कमी असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रान्सयुनियन सिबिलच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२६पर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.
या यादीत कौटन्स रिटेल इंडिया कंपनीवर सर्वाधिक ३४०१ कोटी रुपयांची थकबाकी असून, २०१२ पासून कंपनी तोट्यात गेल्यानंतर वसुली प्रक्रिया सुरू झाली होती. ठाण्यातील करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिक्स (१३३७ कोटी रुपये) आणि ओरिसा मॅगनीज अँड मिनरल्स (१२८७ कोटी रुपये) यांचा त्यानंतर क्रमांक लागतो. जयप्रकाश असोसिएट्सवर ११३० कोटी रुपयांची थकबाकी असून ती कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेत आहे.
इतर बँकांच्या तुलनेत काही मोठ्या उद्योग समूहांची पंजाब अँड सिंध बँकेकडे मर्यादित थकबाकी आहे.
कुणावर कितीचा दावा : रिलायन्स नेव्हलवर १७८ कोटी रुपये, गीतांजली जेम्सवर १२५ कोटी, एरा ग्रुपवर १२३ कोटी, तर किंगफिशर एअरलाइन्सविरोधात १०३ कोटींचा वसुलीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
थकबाकी नेमकी किती?
पंजाब अँड सिंध बँकेला आणखी काही उद्योगांकडून पुढील थकबाकीची रक्कम वसूल करावी लागणार.
कंपनी थकबाकी (रुपयांत)
पाटील कन्स्ट्रक्शन ९१९ कोटी
लँको ग्रुप ७४९ कोटी रुपये
मधुकोन समूहाची छपरा-हाजीपूर ७१७ कोटी
एक्सप्रेसवे
सिम्हापुरी एनर्जी ६४४ कोटी
एसईएल मॅन्युफॅक्चरिंग ६४४ कोटी
कॉनकास्ट स्टील अँड पॉवर ६३३ कोटी
इंडियन टेक्नोमॅक ६२३ कोटी
