देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेत खळबळ उडाली आहे. बँकेच्या तीन कार्यालयांवर बुधवारी जीएसटी विभागाने छापे टाकले आहेत, ते अजूनही सुरुच आहेत. या कारवाईबाबत बँकेने रात्री उशीरा शेअर बाजाराला माहिती दिली आहे. यामुळे आज आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे.
जीएसटी अधिकाऱ्यांनी बँकेच्या मुंबईतील तिन्ही कार्यालयांवर छापे मारले आहेत. ही कारवाई सुरु असून अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सहकार्य करत असल्याचे बँकेने म्हटले आहे.
महाराष्ट्र GST कायदा, 2017 च्या कलम 67 (1) आणि (2) अंतर्गत GST अधिकाऱ्यांनी ICICI बँकेच्या कार्यालयात ही शोध मोहीम राबवली आहे. ICICI बँकेचा दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा हा 11,746 कोटी रुपये झाला आहे. जीएसटी विभागाने किंवा बँकेने या छाप्यामागील कारण सांगितलेले नसले तरी जीएसटी चोरी केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.
ICICI प्रुडेन्शियलला ऑगस्टमध्येच नोटीस...
ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ICICI Pru Life) कडे २७ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्रातील राज्य कर उपायुक्तांनी 429.05 कोटी रुपयांची जीएसटी कर मागणी केली होती. नोटीसमध्ये व्याज आणि दंड देखील समाविष्ट होता. 208.02 कोटी, व्याज 200.22 कोटी आणि दंडासाठी ₹20.80 कोटींचा समावेश होता.