Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम

PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरातील कपातीनंतर पीएनबीनं ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाहूया काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:48 IST2025-06-07T10:43:16+5:302025-06-07T10:48:12+5:30

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरातील कपातीनंतर पीएनबीनं ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाहूया काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं

punjab nationational bank makes big announcement on emi home loan car loanimpact of rbi repo rate decision | PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम

PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम

RBI Repo rate cut: रिझर्व्ह बँकेनं (RBI) शुक्रवारी रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केल्यानंतर आता बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनं (पीएनबी) कर्जाच्या व्याजदरात ०.५० टक्के कपात करण्याची घोषणा केली. यामुळे बँकेच्या विद्यमान आणि नव्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

पीएनबीनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात माहिती दिली आहे. "आमच्या मूल्यवान ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेनं तुमचा ईएमआय अधिक परवडणारा केलाय. रेपो दरात कपात केल्यानंतर (६.०० टक्के ते ५.५० टक्के) पंजाब नॅशनल बँकेनं आरएलएलआर (रेपो लिंक्ड इंटरेस्ट रेट) ०.५० टक्क्यांनी कमी केलाय. रेपो लिंक्ड बेंचमार्क व्याजदरात (RBLR) कपात केल्यानं बँकेचे गृहकर्ज ७.४५ टक्क्यांपासून सुरू होईल, तर वाहन कर्जाच्या बाबतीत ते वार्षिक ७.८ टक्क्यांपासून सुरू होईल.

PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न

रेपो दरात मोठी कपात

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात अर्धा टक्का कपात करून तो ५.५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारीपासून रेपो दरात एकूण एक टक्का कपात केली आहे. नुकत्याच केलेल्या कपातीनंतर रेपो दर गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्याजदरात कपातीचा आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा व्यक्त केली. मात्र, त्याचा परिणाम आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या उत्तरार्धातच दिसेल, असंही ते म्हणाले. मागील ट्रेंडच्या तुलनेत यंदा महत्त्वाच्या पॉलिसी रेट कपातीचं रूपांतर ग्राहकांच्या पातळीवर अधिक वेगानं होईल. महागाईविरोधातील लढाई रिझर्व्ह बँकेनं जिंकली आहे, असं मानता येईल, अशी प्रतिक्रिया मल्होत्रा यांनी दिली.

Web Title: punjab nationational bank makes big announcement on emi home loan car loanimpact of rbi repo rate decision