Lokmat Money > बिझनेस न्यूज > किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स

किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स

अनेक श्रीमंत व्यक्तींना नवीन कार खरेदी करण्याची खूप आवड असते आणि ते लक्झरी गाड्यांचं कलेक्शन ठेवतात, परंतु तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की जगातील सर्वात महागडी कार कोणती आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:15 IST2025-05-12T12:14:28+5:302025-05-12T12:15:58+5:30

अनेक श्रीमंत व्यक्तींना नवीन कार खरेदी करण्याची खूप आवड असते आणि ते लक्झरी गाड्यांचं कलेक्शन ठेवतात, परंतु तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की जगातील सर्वात महागडी कार कोणती आहे.

Priced at Rs 239 crore only 3 people in the world own rolls royce boat tail See details | किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स

किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स

जगात असे अनेक श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे लक्झरी कार्स आहेत. यातील अनेक श्रीमंत व्यक्तींना नवीन कार्स खरेदी करण्याची खूप आवड असते आणि ते लक्झरी गाड्यांचं कलेक्शन ठेवतात, परंतु तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की जगातील सर्वात महागडी कार कोणती आहे आणि ही कार कोणाकडे आहे. हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

जगातील सर्वात महागडी कार

लक्झरी कारचं नाव आलं की सगळ्यात पहिलं नाव येतं ते रोल्स रॉयसचं. रोल्स रॉयस ही ब्रिटीश कार उत्पादक कंपनी आहे, ज्याच्या गाड्या लक्झरी आणि अतिशय महाग आहेत. जगातील सर्वात महागडी कार देखील रोल्स रॉयसचीच आहे, ज्याचं नाव रोल्स रॉयस बोट टेल असं आहे. रोल्स रॉयस बोट टेल ही जगातील सर्वात महागडी आणि आलिशान कार आहे.

ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

रोल्स रॉयस बोट टेलची किंमत

आता रोल्स रॉयस बोट टेलच्या किंमतीबद्दल जाणून घ्यायचं झालं तर या कारची किंमत जवळपास २८ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २३९ कोटी रुपये आहे. या कारचं डिझाईन क्लासिक यॉट म्हणजेच नौकेपासून प्रेरित आहे. अशातच या कारचं नावही बोट टेल असं आहे.

कोणाकडे आहे ही गाडी?

रोल्स रॉयस कंपनीनं आपल्या बोट टेल कारचे केवळ ३ युनिट बनवले आहेत, ज्याची मालकी जगातील तीन लोकांकडे आहे. यामध्ये रॅपर जेड आणि त्याची पत्नी, पॉप आयकॉन बियॉन्से आणि अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू माउरो इकार्डी यांचा समावेश आहे. बोट टेल कारचा तिसरा मालक पर्ल इंडस्ट्रीजचा आहे, ज्याचं नाव सार्वजनिक करण्यात आलेलं नाही.

Web Title: Priced at Rs 239 crore only 3 people in the world own rolls royce boat tail See details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.