Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रज्ञा - डिझेलचोर अटकेत

प्रज्ञा - डिझेलचोर अटकेत

नारायणगाव : शिरोली (सुलतानपूर) येथील दोन तरुणांना १० हजार रुपये किमतीच्या टॅ्रक्टरची बॅटरी व डिझेलचोरी प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अटक केली़, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड यांनी दिली़

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30

नारायणगाव : शिरोली (सुलतानपूर) येथील दोन तरुणांना १० हजार रुपये किमतीच्या टॅ्रक्टरची बॅटरी व डिझेलचोरी प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अटक केली़, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड यांनी दिली़

Pragya - Dieselchor Attempted | प्रज्ञा - डिझेलचोर अटकेत

प्रज्ञा - डिझेलचोर अटकेत

रायणगाव : शिरोली (सुलतानपूर) येथील दोन तरुणांना १० हजार रुपये किमतीच्या टॅ्रक्टरची बॅटरी व डिझेलचोरी प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अटक केली़, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड यांनी दिली़
जयंत रामभाऊ खिल्लारी (रा़ पुणे, मूळ गाव शिरोली, सुलतानपूर, ता. जुन्नर) यांच्या मालकीचा टॅ्रक्टर (क्ऱ एम़ एच़ १४/टी़ एच. ३७८७) हा त्यांच्या राहत्या घराशेेजारील शेडमध्ये उभा केला होता. त्यामध्ये भरण्यासाठी आणलेले ४ हजार ५०० रुपये किमतीचे ३५ लिटर डिझेल कॅन व ६ हजार रुपये किमतीची लावा कंपनीची टॅ्रक्टरची बॅटरी, असा एकूण १० हजार ५०० रुपये किमतीचा माल मंगळवार (दि. १०) रोजी रात्रीच्या सुमारास चोरीला गेला होता़ याबाबत खिल्लारी यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़
या तक्रारीवरून नारायणगाव पोलिसांनी तपास केला असता, चोरीला गेलेला माल शिरोली (सुलतानपूर) येथील गणेश मुळे (वय १८), मयूर आतकरी (वय १८, दोघे रा. शिरोली सुलतानपूर) यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले़ या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, या दोघांकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, या दोघांनी यापूर्वीही अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. त्याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड व दीपक साबळे करीत आहेत़

Web Title: Pragya - Dieselchor Attempted