नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१९-२० साठी अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशामध्ये सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत अल्पबचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही करबचतीसाठी पात्र राहणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला आहे. यामुळे पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आदींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. या योजनांमधील गुंतवणुकीला आयकरामधून सूट मिळत असते. लॉकडाउनमुळे ज्यांना ही गुंतवणूक करता आलेली नाही, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.