Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > राजकीय बातमी - सिंचनाचे ७० हजार कोटी कुठे गेले?

राजकीय बातमी - सिंचनाचे ७० हजार कोटी कुठे गेले?

सिंचनाचे ७० हजार कोटी कुठे गेले?

By admin | Updated: September 13, 2014 23:00 IST2014-09-13T23:00:04+5:302014-09-13T23:00:04+5:30

सिंचनाचे ७० हजार कोटी कुठे गेले?

Political News - Where is the irrigation 70 thousand crore? | राजकीय बातमी - सिंचनाचे ७० हजार कोटी कुठे गेले?

राजकीय बातमी - सिंचनाचे ७० हजार कोटी कुठे गेले?

ंचनाचे ७० हजार कोटी कुठे गेले?
गडकरींचा सवाल :
कवठेमहांकाळ (जि़ सांगली) : राज्यात केवळ एक दशांश सिंचन वाढले, मग सिंचन प्रकल्पांचे सत्तर हजार कोटी रुपये गेले कोठे, सिंचन योजना पूर्ण का झाल्या नाहीत, असा सवाल केंद्रीय परिवहन व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी राज्यातील आघाडी सरकारला केला.
कवठेमहांकाळ येथे आयोजित भाजपा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित घोरपडे यांनी गडकरींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला़ ते पुढे म्हणाले, आज देशात साखरेला किंमत नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. देशातील शेतकरी इथेनॉल तयार करू शकतो, मग आधीच्या काँग्रेस सरकारने पेट्रोल-डिझेलवर इतके पैसे कशाला उधळले? ते शेतकर्‍यांना का दिले नाहीत? शेतकर्‍याचा ट्रॅक्टर त्यानेच तयार केलेल्या इथेनॉलवर चालला पाहिजे. आता आम्ही सांगलीकरांसाठी ग्रीन बस पाठवणार आहोत. ती शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी असेल असे सांगून ते म्हणाले की, युती शासनाच्या काळात आपण मंत्री असताना चार हजार कोटीचे रोखे जनतेतून उभे केले आणि रस्ते बांधले. अठराशे कोटीचे उड्डाणपूल एक हजार कोटीत उभे करून आठशे कोटी वाचवले. कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली. आमच्यानंतर पंधरा वर्षांत राज्यात केवळ एक दशांश टक्के सिंचन वाढले, मग सिंचन प्रकल्पांचे सत्तर हजार कोटी रुपये गेले कोठे? भ्रष्टाचार कोणी केला? सिंचन योजना पूर्ण का झाल्या नाहीत? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी त्याचे उत्तर द्यावे. या सरकारने राज्याला मागे नेल्याचा आरोप गडकरी यांनी केला़ (प्रतिनिधी)
--------------------------------------------
बॉक्स
आबांना एक आश्रम बांधून द्या!
आर. आर. पाटील म्हणजे तर मिठू-मिठू बोलणारा पोपट! त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना पाच हजार रुपये वाया घालवू नयेत. संजयकाका, तुमच्या खासदार फंडातून आर. आर. आबांना एक आश्रम बांधून द्या, अशी मिश्कील टिप्पणी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार खा. संजय पाटील यांच्याकडे पाहत केली़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

Web Title: Political News - Where is the irrigation 70 thousand crore?