PM Surya Ghar Yojana : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना’ देशभरात वेगाने राबवली जात आहे. नागरिकांना वीजबिलाच्या ताणातून मुक्त करणारी ही योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. या योजनेअंतर्गत घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवून दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज आणि मोठी सरकारी सबसिडी दिली जाते. सरकारने या योजनेद्वारे 1 कोटी घरांना मोफत वीज देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
काय आहे योजना ?
‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना’ ही रुफटॉप सोलर प्रकल्पासाठीची सरकारी योजना आहे. याचा उद्देश नागरिकांना स्वतःची वीज निर्मिती करण्यास सक्षम बनवणे, वीजबिल मोठ्या प्रमाणात कमी करणे, 24 तास अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे आणि देशातील कार्बन उत्सर्जन घटवणे आहे. ज्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याची जागा आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
रजिस्ट्रेशन कसे करायचे?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmsuryaghar.gov.in
Apply Now वर क्लिक करा
मोबाइल नंबर व कॅप्चा भरून OTPद्वारे लॉगिन करा
नाव, पत्ता, राज्य, जिल्हा, ईमेल इ. माहिती भरा
‘Apply for Solar Rooftop’ निवडा
राज्य, जिल्हा व DISCOM निवडा आणि ग्राहक क्रमांक भरून फॉर्म सबमिट करा
काय-काय कागदपत्रे लागतील?
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
उत्पन प्रमाणपत्र
वीजबिल
रेशन कार्ड
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
बँक पासबूक
अर्जानंतरची प्रक्रिया काय?
DISCOM तुमची माहिती तपासेल
माहिती योग्य आढळल्यास अप्रूवल दिले जाईल
त्यानंतर पोर्टलवरून वेंडर निवडावा
वेंडर घराची पाहणी करून किती kW चा प्लांट बसवायचा ते निश्चित करेल
सोलर पॅनल इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर DISCOM नेट मीटर बसवेल
ग्रिड कनेक्शन व तपासणी झाल्यावर फायनल अप्रूवल दिले जाईल
सबसिडी थेट बँक खात्यात जमा होईल
त्यानंतर दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळू लागेल
सोलर सिस्टीमवर किती सबसिडी मिळेल?
केंद्र सरकारकडून सबसिडी:
1 kW : ₹30,000
2 kW : ₹60,000
3 kW व त्यापुढे : ₹78,000
याशिवाय राज्य सरकारकडूनही स्वतंत्रपणे सबसिडी मिळत असल्याने एकूण लाभ आणखी वाढतो. त्यामुळे सबसिडीची रक्कम प्रत्येक राज्यात वेगळी असू शकते.
ही योजना विशेष का?
वीजबिलात मोठी बचत
सतत उपलब्ध पर्यावरणपूरक वीज
देशातील कार्बन फुटप्रिंट घटविण्यास मोठी मदत
घरगुती खर्चात वर्षाला हजारो रुपयांची बचत
