Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य

‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य

इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन  बूस्ट इंडियाज एक्स्पोर्ट ऑफ प्लास्टिक फिनिश्ड प्रोडक्ट ग्लोबल सोर्सिंग हब नावाने २४ सप्टेंबर रोजी मुंबईत प्लास्टिक उद्योगांची परिषद होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:22 IST2025-09-19T10:21:42+5:302025-09-19T10:22:25+5:30

इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन  बूस्ट इंडियाज एक्स्पोर्ट ऑफ प्लास्टिक फिनिश्ड प्रोडक्ट ग्लोबल सोर्सिंग हब नावाने २४ सप्टेंबर रोजी मुंबईत प्लास्टिक उद्योगांची परिषद होणार आहे.

Plastic industry in trouble due to tariffs Target to increase exports from India to other countries fourfold in 3 years | ‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य

‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य

मुंबई : अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताच्या प्लास्टिक उद्योगावर प्रतिकूल परिणाम होणार आहे, अशी भीती ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे जनरल कौन्सिलचे चेअरमन अरविंद मेहता यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी व्यक्त केली.

इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन  बूस्ट इंडियाज एक्स्पोर्ट ऑफ प्लास्टिक फिनिश्ड प्रोडक्ट ग्लोबल सोर्सिंग हब नावाने २४ सप्टेंबर रोजी मुंबईत प्लास्टिक उद्योगांची परिषद होणार आहे. त्या निमित्ताने  प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून प्लास्टिक उद्योगाची निर्यात वाढविण्यासाठी तयारी करीत आहोत, मात्र, टॅरिफमुळे सरकारने इन्सेन्टिव्ह देणे आवश्यक असल्याचेही या असोसिएशनचे जनरल कौन्सिलचे चेअरमन  मेहता यांनी सांगितले.

चार पटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने  प्लास्टिक असोसिएशनने  भारतातील उद्योजकांकडून अमेरिका वगळता इतर देशांमध्ये निर्यात करण्यासाठी  पाऊल उचलल्याचे  चेअरमन अरविंद मेहता यांनी सांगितले. येत्या ३  वर्षांत भारतातून इतर  देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य असल्याचे ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष एम.  शाह, पाध्यक्ष बिपीन देसाई यांनी सांगितले.  

Web Title: Plastic industry in trouble due to tariffs Target to increase exports from India to other countries fourfold in 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.