Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता

फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता

बजेट फोनही झाले महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 07:38 IST2026-04-10T07:37:17+5:302026-04-10T07:38:13+5:30

बजेट फोनही झाले महाग

Phones become 40% more expensive, will prices increase further? Sales likely to fall by up to 10 percent | फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता

फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय स्मार्टफोन बाजारपेठ सध्या मोठ्या संकटातून जात असून, चिप टंचाई आणि जागतिक भू-राजकीय तणावामुळे विवो, सॅमसंग, ओप्पो आणि शाओमी यांसारख्या नामवंत कंपन्यांनी आपल्या फोनच्या किमतीत तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

विशेष म्हणजे, ही दरवाढ केवळ प्रीमियम फोनपुरती मर्यादित नसून बजेट फोन्सनाही याचा मोठा फटका बसला आहे. किमतीतील या वाढीमुळे आगामी काळात मोबाइल विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बजेट फोनही झाले महाग

  • काही महिन्यांपूर्वी १० हजार रुपयांच्या आत मिळणाऱ्या फोनसाठी आता ग्राहकांना १४ हजार मोजावे लागत आहेत.
  • विवोने आपल्या ‘टी४ लाईट’ या बजेट फोनची किंमत ९,९९९ रुपयांवरून थेट १३,९९९ रुपये केली आहे.
  • सॅमसंगनेही आपल्या मिड-रेंजमधील ‘गॅलेक्सी ए३६’ मॉडेल ३६ टक्क्यांच्या दरवाढीसह ५२,९९९ रुपयांवर लाँच केले.


...तर मोबाइल विक्रीवर होऊ शकतो परिणाम

ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशनच्या मते, किमतीतील या वाढीमुळे आगामी काळात मोबाइल विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विविध कंपन्यांची दरवाढ किती?

  • शाओमी ०७     ३२%
  • सॅमसंग ०२     ३६%
  • विवो ११      ४०% 
  • ओप्पो १५     ४१%
  • रियलमी ०९     ५३%


चिप्स महागल्या

एआय तंत्रज्ञान मागणीमुळे  मेमरी चिप्सच्या किमतीत डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान १२० टक्क्यांनी वाढ झाली.

Web Title : फ़ोन की कीमतें 40% बढ़ीं; क्या और बढ़ेंगी और बिक्री घटेगी?

Web Summary : चिप की कमी और भू-राजनीतिक तनाव के कारण भारतीय स्मार्टफोन की कीमतें 40% तक बढ़ गईं। बजट फोन भी प्रभावित, 10% बिक्री घटने की आशंका। विवो, सैमसंग, ओप्पो और शाओमी ने कीमतें बढ़ाईं।

Web Title : Phone Prices Soar 40%; Further Hikes & Sales Decline Loom?

Web Summary : Indian smartphone prices surged 40% due to chip shortages and geopolitical tensions. Budget phones are also affected, potentially causing a 10% sales decline. Vivo, Samsung, Oppo, and Xiaomi have increased prices.

टॅग्स :Mobileमोबाइल