lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या, आजचे दर...

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या, आजचे दर...

Petrol Diesel Price: रेकॉर्ड स्तरावर पोहोचलेल्या इंधनाच्या किंमतींपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 10:52 AM2021-01-08T10:52:06+5:302021-01-08T10:53:06+5:30

Petrol Diesel Price: रेकॉर्ड स्तरावर पोहोचलेल्या इंधनाच्या किंमतींपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

petrol prices can be reduced by up to rs 5 per liter petrol diesel price today | Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या, आजचे दर...

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या, आजचे दर...

Highlightsलॉकडाऊन काळात सरकारने पेट्रोलवर एकरकमी 10 रुपये उत्पादन शुल्क वाढविले होते.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑयल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (HPCL) या तेलकंपन्या जवळपास एका महिन्यानंतर इंधनाच्या किंमतींबाबत आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत 23 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर आज शुक्रवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल झाले नाही आहेत.

रेकॉर्ड स्तरावर पोहोचलेल्या इंधनाच्या किंमतींपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चांकी पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा देण्याची  शिफारस केली आहे. उत्पादन शुल्क कमी करून सामान्यांना दिलासा दिला जाऊ शकतो, असे मंत्रालयाने असे म्हटले आहे.

5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात
मंत्रालयाच्या मते, कोरोना संकट काळात पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्याने कपात केली तर पेट्रोलचे दर 5 रुपयांपर्यंत प्रति लीटरमागे कमी होऊ शकतात. लॉकडाऊन काळात सरकारने पेट्रोलवर एकरकमी 10 रुपये उत्पादन शुल्क वाढविले होते. तसेच, उत्पादन शुल्कात कपात केली गेली तर ग्राहकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यांना देखील सहकार्य करावे लागेल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

देशातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
>> दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये आणि डिझेल 74.38 रुपये लीटर
>> मुंबई - पेट्रोलचे दर 90.83 रुपये आणि डिझेल 81.07 रुपये लीटर
>> कोलकाता - पेट्रोल 85.68 रुपये आणि डिझेल 77.97 रुपये लीटर
>> चेन्नई - पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझेलचे दर 79.72 रुपये लीटर
>> बंगळुरु - पेट्रोल 87.04 रुपये आणि डिझेल 78.87 रुपये लीटर
>> नोएडा- पेट्रोल 84.06 रुपये आणि डिझेल 74.82 रुपये लीटर
>> गुरुग्राम- पेट्रोल 82.39 रुपये आणि डिझेल 74.97 रुपये प्रति लीटर
>> लखनऊ - पेट्रोल 83.98 रुपये आणि डिझेल 74.74 रुपये प्रति लीटर
>> पाटणा- पेट्रोल 86.75 रुपये आणि डिझेल 79.51 रुपये प्रति लीटर

अशाप्रकारे जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचे नवे दर....
देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. याशिवाय, पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही मोबाइल फोनवर SMS द्वारे तपासू शकता. यासाठी तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

Web Title: petrol prices can be reduced by up to rs 5 per liter petrol diesel price today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.