Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price Today: कच्चं तेल ११२ डॉलर्सच्या पार; पेट्रोल-डिझेल कुठे महाग आणि कुठे स्वस्त? पाहा तुमच्या शहराचे नवे दर

Petrol Diesel Price Today: कच्चं तेल ११२ डॉलर्सच्या पार; पेट्रोल-डिझेल कुठे महाग आणि कुठे स्वस्त? पाहा तुमच्या शहराचे नवे दर

Petrol Diesel Price Today 23 March 2026: जर तुम्ही आज तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर आधी पेट्रोल-डिझेलचे ताजे दर नक्की तपासा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:52 IST2026-03-23T14:50:24+5:302026-03-23T14:52:17+5:30

Petrol Diesel Price Today 23 March 2026: जर तुम्ही आज तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर आधी पेट्रोल-डिझेलचे ताजे दर नक्की तपासा.

Petrol Diesel Price Today 23 march Crude oil crosses 112 dollar Where is petrol diesel expensive and where is it cheap See the new prices of your city | Petrol Diesel Price Today: कच्चं तेल ११२ डॉलर्सच्या पार; पेट्रोल-डिझेल कुठे महाग आणि कुठे स्वस्त? पाहा तुमच्या शहराचे नवे दर

Petrol Diesel Price Today: कच्चं तेल ११२ डॉलर्सच्या पार; पेट्रोल-डिझेल कुठे महाग आणि कुठे स्वस्त? पाहा तुमच्या शहराचे नवे दर

Petrol Diesel Price Today 23 March 2026: जर तुम्ही आज तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर आधी पेट्रोल-डिझेलचे ताजे दर नक्की तपासा. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिका-इराणमधील शाब्दिक युद्धामुळे आता तेलाच्या किमतींवर परिणाम होऊ लागला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्चं तेल प्रति बॅरल $११२ च्या पार गेलंय, ज्याचा परिणाम भारतातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर झालाय. या दरवाढीमुळे आज, २३ मार्च रोजी भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले आहेत. काही ठिकाणी तेल महागले आहे, तर काही ठिकाणी किरकोळ दिलासा मिळाला आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका, $११२ च्या पार

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटमनंतर जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली. सोमवारी जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड $११२.१७ प्रति बॅरलवर पोहोचलं, तर अमेरिकन क्रूड (WTI) देखील $१०० च्या जवळ पोहोचलंय आहे. विशेष म्हणजे, युद्ध सुरू होण्यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी ब्रेंट क्रूड केवळ $७२.४८ वर होतं, म्हणजेच काही आठवड्यांतच किमतीत मोठी वाढ झाली आहे.

HDFC Bankचे शेअर चौथ्या दिवशीही घसरले; ४ दिवसांत १.३५ लाख कोटींचा फटका, ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर

मेट्रो शहरांमधील आजचे दर

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) आज सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. दिल्ली, मुंबई सारख्या प्रमुख मेट्रो शहरांमध्ये फारसा बदल झालेला नाही:

  • दिल्ली: पेट्रोल ₹९४.७७ प्रति लिटर आणि डिझेल ₹८७.६७ प्रति लिटर.
  • मुंबई: पेट्रोल ₹१०३.५४ प्रति लिटर आणि डिझेल ₹९०.०३ प्रति लिटर.
  • कोलकाता: पेट्रोल ₹१०५.४५ प्रति लिटर आणि डिझेल ₹९२.०२ प्रति लिटर.
  • चेन्नई: पेट्रोल ₹१००.८४ प्रति लिटर आणि डिझेल ₹९२.३९ प्रति लिटर.

बिहार-यूपीसह या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले

  • उत्तर प्रदेश: पेट्रोल २२ पैशांनी वाढून ₹९५.०० आणि डिझेल ६८ पैशांनी वाढून ₹८८.७२ प्रति लिटर.
  • बिहार: पेट्रोल १ पैशाने वाढून ₹१०६.९५ आणि डिझेल ₹९३.१४ प्रति लिटर.
  • झारखंड: पेट्रोल ७४ पैशांनी वाढून ₹९९.१६ आणि डिझेल ७३ पैशांनी वाढून ₹९३.८९ प्रति लिटर.
  • गोवा: पेट्रोल ४४ पैशांनी वाढून ₹९६.९६ आणि डिझेल ४३ पैशांनी वाढून ₹८८.७१ प्रति लिटर.
  • केरळ: पेट्रोल ४४ पैशांनी वाढून ₹९६.९६ आणि डिझेल ५३ पैशांनी वाढून ₹९६.०२ प्रति लिटर.
  • तमिळनाडू: पेट्रोल ८ पैशांनी वाढून ₹१०२.३४ आणि डिझेल ८ पैशांनी वाढून ₹९३.८९ प्रति लिटर.

Web Title : कच्चा तेल $112 के पार, पेट्रोल-डीजल की कीमतों में वृद्धि

Web Summary : वैश्विक तनाव से कच्चे तेल की कीमतें $112 के पार, भारतीय ईंधन की कीमतें प्रभावित। कुछ राज्यों में वृद्धि; कुछ को मामूली राहत। मेट्रो शहरों में ज्यादातर स्थिर, बिहार और उत्तर प्रदेश में मूल्य वृद्धि।

Web Title : Petrol, Diesel Prices Rise as Crude Oil Surpasses $112

Web Summary : Global tensions push crude oil past $112, impacting Indian fuel prices. Some states see increases; others experience slight relief. Metro cities remain mostly stable, while Bihar and Uttar Pradesh see price hikes.