चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर या कालावधीत भारताच्या प्रत्यक्ष करसंकलनात ८ टक्क्यांची वाढ झाली असून, एकूण महसूल १७.०४ लाख कोटी रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे, यंदा रिफंड प्रक्रिया संथ राहिल्यानं निव्वळ करसंकलनाचा आकडा उंचावलेला दिसत आहे.
या १७.०४ लाख कोटींच्या महसुलात कॉर्पोरेट कराचा वाटा ८.१७ लाख कोटी रुपये तर वैयक्तिक आयकर आणि इतर करांमधून ८.४७ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. शेअर बाजारातील वाढत्या उलाढालीचं प्रतिबिंबही सरकारी तिजोरीत उमटलं असून, शेअर बाजारातील कराद्वारे (एसटीटी) सरकारला ४०,१९५ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती आयकर खात्यानं शुक्रवारी दिली.
संकलनात ४ टक्के वृद्धी
रिफंड देण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची घट झाली आहे. सरकारनं १७ डिसेंबरपर्यंत २.९७ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला. तर प्रत्यक्ष कर संकलनात २०.०१ लाख कोटींनी (४.१६ टक्के वाढ) झाली आहे.
लक्ष्याकडे वाटचाल
सरकारनं २०२५-२६ साठी २५.२० लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष करसंकलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
