Aadhaar Pan Linking Process : केंद्र सरकारने पॅन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी जाहीर केली आहे. UIDAI ने स्पष्ट केले आहे की, सर्व करदात्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आपले पॅन कार्डआधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर ही डेडलाईन चुकली, तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड 'निष्क्रिय' होईल. न कार्ड निष्क्रिय झाल्यास, कर भरणे, बँकेची महत्त्वाची कामे आणि इतर आर्थिक व्यवहार करणे अत्यंत कठीण होणार आहे.
आधार अपडेटचे नवे नियम लागू
- नोव्हेंबर महिन्यापासून आधार अपडेटचे काही नवे नियम लागू झाले आहेत. आता तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर यांसारख्या डेमोग्राफिक डिटेल्स ऑनलाइन बदलू शकता.
- सर्वात आधी myAadhaar पोर्टलवर जा.
- पॅन किंवा पासपोर्टसारख्या कागदपत्रांसह तुमचा तपशील क्रॉस-चेक केला जाईल.
- या बदलांसाठी तुम्हाला जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची किंवा आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही.
- मात्र, फिंगरप्रिंट, डोळ्याचा स्कॅन, फोटो यांसारख्या बायोमेट्रिक बदलांसाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावरच जावे लागेल.
बदल शुल्काची नवीन यादी
| तपशीलाचा प्रकार | शुल्क |
| डेमोग्राफिक तपशील (नाव, पत्ता, जन्मतारीख) | ७५ रुपये |
| बायोमेट्रिक बदल | १२५ रुपये |
| ऑनलाइन कागदपत्रे अपडेट | १४ जून २०२६ पर्यंत विनामूल्य |
लहान मुलांसाठी सूट: ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे विनामूल्य असेल. पालक हे अपडेट्स सहजपणे करू शकतात.
पॅन आणि आधार कार्ड कसे लिंक करावे?
- आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जा: https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/
- होमपेजवर दिसणाऱ्या 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा १० अंकी पॅन क्रमांक आणि १२ अंकी आधार क्रमांक टाका.
- सूचनांचे अनुसरन करून आवश्यक शुल्क (असल्यास) भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- सिस्टम तुमचा अर्ज आपोआप लिंक करेल आणि तुम्हाला कन्फर्मेशन देईल.
- त्याच पोर्टलवर 'लिंक आधार स्टेटस'वर क्लिक करून पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यास तुमचे कार्ड लिंक झाले आहे की नाही, हे लगेच कळेल.
निष्क्रिय पॅनमुळे आर्थिक अडचणी वाढतील
नवीन पॅन कार्ड बनवणाऱ्यांसाठी आणि जुन्या धारकांसाठी ई-केवायसीसाठी लिंकिंग अनिवार्य आहे. बँका आणि वित्तीय संस्था आता ओटीपी किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतात, जी खूप जलद आणि पेपरलेस असते.
वाचा - पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
तुमच्या पॅनचे स्टेटस तुम्ही आयकर वेबसाइटवर “Verify Your PAN” या पर्यायाद्वारे तपासू शकता. ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत चुकल्यास, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि तुमच्या अनेक आर्थिक कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होईल.
