Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाकिस्तानच्या आनंदावर विरजण; IMF ला दिसला ११ अब्ज डॉलर्सचा घोटाळा, आता लपवण्यासाठी पळापळ

पाकिस्तानच्या आनंदावर विरजण; IMF ला दिसला ११ अब्ज डॉलर्सचा घोटाळा, आता लपवण्यासाठी पळापळ

IMF on Pakistan: भयंकर आर्थिक संकटातून जात असलेला पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, अशातच आता पाकिस्तानचा एक खेळ समोर आलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:28 IST2025-10-07T13:26:21+5:302025-10-07T13:28:09+5:30

IMF on Pakistan: भयंकर आर्थिक संकटातून जात असलेला पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, अशातच आता पाकिस्तानचा एक खेळ समोर आलाय.

pakistan economy waiting for loan imf 11 billion trade data discrepancy | पाकिस्तानच्या आनंदावर विरजण; IMF ला दिसला ११ अब्ज डॉलर्सचा घोटाळा, आता लपवण्यासाठी पळापळ

पाकिस्तानच्या आनंदावर विरजण; IMF ला दिसला ११ अब्ज डॉलर्सचा घोटाळा, आता लपवण्यासाठी पळापळ

IMF on Pakistan: भयंकर आर्थिक संकटातून जात असलेला पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, आयएमएफनं पैसे देण्यापूर्वी पाकिस्तानकडून स्पष्टीकरण मागितलंय आणि मदतीसाठी आर्थिक डेटामधील विसंगती आधी दूर करावी लागेल, असंही म्हटलंय. ही विसंगती पाकिस्तानच्या दोन एजन्सींनी दिलेल्या डेटामध्ये दिसली आहे. ही विसंगती आधी दूर करा, त्यानंतर आर्थिक मदत दिली जाईल, असं आयएमएफनं स्पष्ट केलंय. या आर्थिक डेटामध्ये सुमारे ११ अब्ज डॉलरची विसंगती दिसत आहे.

आयएमएफ पाकिस्तानच्या व्यापार आकडेवारीची तपासणी करत आहे. या दरम्यान, आयएमएफला पाकिस्तानच्या दोन एजन्सींनी दिलेल्या आकडेवारीत ११ अब्ज डॉलरचा फरक दिसत आहे. आयएमएफनं दिलेल्या माहितीनुसार, आकडेवारीतील ही विसंगती २०२३ ते २०२५ दरम्यानची आहे. यामुळे पाकिस्तानच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आणि आयएमएफकडून मिळणाऱ्या निधीवरही याचा परिणाम होऊ शकतो.

GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

कोणत्या आकडेवारीत किती फरक?

पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, पाकिस्तानच्या रेव्हेन्यू ऑटोमेशन लिमिटेड (PRAL) आणि पाकिस्तान सिंगल विंडोनं (PSW) आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जो डेटा दिला आहे, त्यात ५.१ अब्ज डॉलरचा फरक दिसत आहे. रेव्हेन्यू एजन्सीनं व्यापाराची आकडेवारी ५.१ अब्ज डॉलरनं कमी दाखवली आहे. याच्या एक वर्षानंतर आयातीचे आकडे वाढून ५.७ अब्ज डॉलरवर पोहोचलेत. पाकिस्तान सिंगल विंडोचा डेटा स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीपेक्षाही जास्त होता. या डेटाचा वापर पाकिस्तानच्या चालू खात्याच्या तुटीच्या गणनेसाठी केला गेला होता.

आयएमएफ काय म्हणालं?

पाकिस्तानच्या व्यापार आकडेवारीतील फरकामुळे आयएमएफनं अधिक पारदर्शकता राखण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून या आकडेवारीबद्दलचा अविश्वास कमी होईल. यापूर्वी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रेव्हेन्यू एजन्सीला डिसेंबरपर्यंत बंद करण्याचा आदेश दिला होता. या एजन्सीच्या आयटी सिस्टीमला जागतिक बँकेकडून आर्थिक सहाय्यता दिली जात आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही एजन्सी आता बंद करण्यावर विचार सुरू आहे.

चीन-पाकिस्तानच्या आकडेवारीतही फरक

एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, PRAL नं कच्च्या मालाच्या आयातीच्या आकडेवारीला कमी दाखवलं आहे, कारण त्यांनी ७ प्रकारच्या स्रोतांकडून आपले आकडे जमा केले होते. दुसरीकडे, PSW नं आपले आकडे १५ स्रोतांकडून जमा केले आहेत. एवढंच नाही, तर पाकिस्तानी आयातदारांनी आणि चिनी निर्यातकांनी घोषित केलेल्या मालामध्येही मोठा फरक दिसत आहे. आयएमएफच्या या तक्रारीनंतर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याची चौकशी करण्यासाठी एक समितीही बनवली होती. दरम्यान, 'आयातीचे आकडे कमी दाखवण्यामागे जिनिव्हास्थित आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राला अहवाल देणाऱ्या पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचा (PBS) हात असल्याचं समितीनं म्हटलं.. PBS ने २०१७ मध्ये तयार केलेल्या एका जुन्या प्रोग्राम क्वेरीमुळेच आयातीचे आकडे कमी दाखवले असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Web Title : IMF को पाकिस्तान में मिला 11 अरब डॉलर का घोटाला, मची खलबली।

Web Summary : आईएमएफ को पाकिस्तान के व्यापार डेटा में 11 अरब डॉलर की विसंगति मिली, जिससे पारदर्शिता पर सवाल उठे और महत्वपूर्ण फंडिंग प्रभावित होने की आशंका है। विभिन्न पाकिस्तानी एजेंसियों के डेटा में भिन्नता है, जिससे आईएमएफ ने स्पष्टीकरण और अधिक जवाबदेही की मांग की है।

Web Title : IMF spots $11 billion discrepancy, Pakistan scrambles to conceal.

Web Summary : IMF found an $11 billion discrepancy in Pakistan's trade data between 2023-2025, raising concerns about transparency and potentially impacting crucial funding. Discrepancies exist between data from different Pakistani agencies, prompting IMF to demand clarification and greater accountability.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.