Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान १ - शिवसेना होणार सत्तेत सहभागी!

पान १ - शिवसेना होणार सत्तेत सहभागी!

शिवसेना होणार सत्तेत सहभागी!

By admin | Updated: November 1, 2014 21:48 IST2014-11-01T21:48:12+5:302014-11-01T21:48:12+5:30

शिवसेना होणार सत्तेत सहभागी!

Page 1 - Shiv Sena participation in power! | पान १ - शिवसेना होणार सत्तेत सहभागी!

पान १ - शिवसेना होणार सत्तेत सहभागी!

वसेना होणार सत्तेत सहभागी!
- जेटली करताहेत ठाकरे यांच्याशी चर्चा
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या १५ दिवसांत होण्याची शक्यता असून, शिवसेनेला सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीचा बहिष्काराचा पवित्रा मागे घेत भाजपा सरकारच्या शपथविधी समारंभाला हजेरी लावली होती. त्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी होण्याचे संकेत कालच मिळाले होते. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या बोलणी सुरू आहे. खासदार अनिल देसाई हे समन्वयाच्या भूमिकेत आहेत, असे समजते. भाजपाने शिवसेनेला सहा मंत्रीपदे देवू केली असली तरी शिवसेना १२ मंत्री पदांवर अडून असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रामध्ये एक मंत्रीपद वाढवून द्यावे आणि एक राज्यपाल पददेखील द्यावे, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, चर्चा केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असावी, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये रवींद्र वायकर, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अर्जुन खोतकर, संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. (विशेष प्रतिनिधी)
--------------------------------------------------
चौकट
शिवसेनेला सत्तेत कोणत्या अटी शर्तीवर घ्यायचे याची चर्चा केंद्रीय पातळीवर चालू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलेे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे!
मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे असल्याने प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याला देण्याचे संकेत मिळाले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी चर्चा होती़ मात्र, ते मंत्री झाल्याने हे पद मराठवाड्याला मिळण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्हयातील प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांच्या नावाचा विचार होत असून, मुंबईचे सरचिटणीस अतुल भातखळकर यांनाही नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होते.

Web Title: Page 1 - Shiv Sena participation in power!