Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान १/स्वयंपाकाचा गॅस महागला

पान १/स्वयंपाकाचा गॅस महागला

स्वयंपाकाचा गॅस

By admin | Updated: October 29, 2014 22:08 IST2014-10-29T22:08:14+5:302014-10-29T22:08:14+5:30

स्वयंपाकाचा गॅस

P1 / cooking gas expensive | पान १/स्वयंपाकाचा गॅस महागला

पान १/स्वयंपाकाचा गॅस महागला

वयंपाकाचा गॅस
तीन रुपयांनी महागला
नवी दिल्ली- सरकारने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर विक्रेत्यांचे कमिशन वाढविल्यामुळे सबसिडीवर मिळणारे एलपीजी सिलिंडर तीन रुपयांनी महागले आहे.
१४.२ किलोच्या प्रति सिलिंडरमागे कमिशन तीन रुपयांनी वाढवून ४३ रुपये ७१ पैसे करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात घेतलेल्या या निर्णयाने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमतही वाढविण्यात आली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
यापूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळी प्रति सिलिंडर ३ रुपये ४६ पैसे वाढ करून ४० रुपये ७१ पैसे एवढे कमिशन झाले होते.
कमिशनचे नवे दर २३ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. त्यानुसार मुंबईत हे दर ४५२ रुपये असतील. यापूर्वी ४४८.५० रुपये होते. विक्रेत्यांचे कमिशन वाढल्याने गैरसबसिडी गॅस सिलिंडरचे दर ८०० रुपयांवरून ८८३.५० रुपये झाले आहेत. देशभरातील १३,८९६ वितरकांना या कमिशन वाढीला लाभ होणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)









Web Title: P1 / cooking gas expensive