Lokmat Money > बिझनेस न्यूज > साडेपाच लाखांवर घरे विक्रीविना पडून, परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक फटका

साडेपाच लाखांवर घरे विक्रीविना पडून, परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक फटका

का परवडणाऱ्या घरांना बसतोय फटका, जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:05 IST2025-04-15T12:05:52+5:302025-04-15T12:05:52+5:30

का परवडणाऱ्या घरांना बसतोय फटका, जाणून घ्या.

Over 5 5 lakh houses remain unsold affordable homes hit hardest know what is the reason | साडेपाच लाखांवर घरे विक्रीविना पडून, परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक फटका

साडेपाच लाखांवर घरे विक्रीविना पडून, परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक फटका

देशातील सात प्रमुख शहरांमध्ये झालेल्या विक्रीमुळे जानेवारी-मार्च तिमाहीच्या अखेरीस रिकाम्या घरांची संख्या वर्षानुवर्षे ४ टक्क्यांनी घसरून सुमारे ५.६ लाख युनिट्सवर आली आहे. रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२५ च्या अखेरीस सात प्रमुख शहरांमध्ये विक्री न झालेल्या घरांची संख्या ५,५९,८०८ युनिट्सपर्यंत कमी झाली. मार्च २०२४ च्या अखेरीस हा आकडा ५,८०,८९५ युनिट्स इतका होता.

लक्झरी घरांची मागणी वाढली

गेल्या दोन ते तीन वर्षांत लक्झरी घरांची मागणी प्रचंड वाढली आहे. महामारीमुळे परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक फटका बसला, विक्री आणि नवीन बांधकाम यात घट झाली. जानेवारी-मार्च २०२५ मध्ये टॉप सात शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांची विक्री २८ टक्क्यांनी घसरून ९३,२८० युनिट्सवर आली, गेल्या वर्षी याच कालावधीत १.३० लाख युनिट्सपेक्षा जास्त होती.

Web Title: Over 5 5 lakh houses remain unsold affordable homes hit hardest know what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.