Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Oracle Layoffs 2026: AI खाऊ लागली नोकऱ्या, आता 'या' विस्तारासाठी Oracle ३० हजार लोकांना कामावरुन काढणार?

Oracle Layoffs 2026: AI खाऊ लागली नोकऱ्या, आता 'या' विस्तारासाठी Oracle ३० हजार लोकांना कामावरुन काढणार?

Oracle Layoffs 2026: अमेरिकेतील दिग्गज आयटी कंपनी ओरॅकल मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची योजना आखत आहे. पाहा एआयमुळे म्हणजेच नक्की काय आहे यामागचं कारण.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:48 IST2026-03-07T14:46:42+5:302026-03-07T14:48:01+5:30

Oracle Layoffs 2026: अमेरिकेतील दिग्गज आयटी कंपनी ओरॅकल मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची योजना आखत आहे. पाहा एआयमुळे म्हणजेच नक्की काय आहे यामागचं कारण.

Oracle Layoffs 2026 AI started reducing jobs now Oracle will lay off 30 thousand people for data center expansion | Oracle Layoffs 2026: AI खाऊ लागली नोकऱ्या, आता 'या' विस्तारासाठी Oracle ३० हजार लोकांना कामावरुन काढणार?

Oracle Layoffs 2026: AI खाऊ लागली नोकऱ्या, आता 'या' विस्तारासाठी Oracle ३० हजार लोकांना कामावरुन काढणार?

Oracle Layoffs 2026: अमेरिकेतील दिग्गज आयटी कंपनी ओरॅकल मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची योजना आखत आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, ओरॅकल सुमारे ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची शक्यता आहे. डेटा सेंटर्सची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यासाठी ही कपात केली जात असल्याचं सांगण्यात येतंय. तसंच, डेटा सेंटर्सच्या विस्तारासाठी कंपनी ५० अब्ज डॉलर्सहून अधिक निधी उभारण्याच्या तयारीत असल्याचंही वृत्त आहे. ही कपात एआय (AI) लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेत असल्याचा पुरावा मानली जात आहे.

एआयमुळे मनुष्यबळाची गरज कमी?

जेव्हापासून एआयचा विस्तार होत आहे, तेव्हापासून अनेक लोकांचे काम आता मशिनद्वारे केलं जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे मानवी संसाधनांची आवश्यकता कमी होईल, असा तर्क लावला जातोय. दुसरीकडे, काही लोकांचं असेही मत आहे की एआयमुळे काही नोकऱ्या जातील, परंतु नवीन नोकरीच्या संधीही निर्माण होतील.

सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा जोरदार तेजी, अमेरिकेच्या 'या' आकडेवरीचा दिसला मोठा परिणाम

ओरॅकलसमोर रोख रकमेचे संकट

ब्लूमबर्ग न्यूजच्या माहितीनुसार, एआय डेटा सेंटरच्या विस्तारासाठी उद्भवलेलं रोख रकमेचं संकट दूर करण्यासाठी ओरॅकलनं हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केलीये. ही कपात वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जाईल. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्येही कंपनीने भारत, अमेरिका, कॅनडा आणि फिलीपिन्समध्ये सुमारे ३,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं होतं.

कधी सुरू होणार कर्मचारी कपातीची प्रक्रिया?

जर ओरॅकलनं ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, तर ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठी पुनर्रचना प्रक्रिया असेल. या प्रक्रियेची सुरुवात याच महिन्यापासून होऊ शकते. ओरॅकल केवळ कर्मचारी कपातीची योजना आखत नाही, तर नवीन भरती देखील थांबवण्यात आली आहे. मे २०२५ पर्यंत जगभरात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या १,६२,००० होती. ही कंपनी मेटा, xAI, OpenAI सारख्या क्लायंट्सना सेवा देते, ज्यासाठी ते डेटा सेंटर विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहेत. या विस्तारासाठी मोठा खर्च अपेक्षित असून, तो पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला जातोय.

बँकांनी कर्ज कमी केल्याचा परिणाम

डेटा सेंटर्सच्या विस्ताराचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असताना अमेरिकेतील अनेक बँकांनी या प्रकल्पासाठी कर्जाची रक्कम कमी केली आहे. यामुळे कंपनीसमोर पैशांची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, कंपनी कर्मचारी कपात करून आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title : ओरेकल में छंटनी 2026: एआई का प्रभाव, 30,000 नौकरियां खतरे में?

Web Summary : ओरेकल ने 2026 तक 30,000 कर्मचारियों की छंटनी की योजना बनाई है। एआई और डेटा सेंटर विस्तार के कारण यह पुनर्गठन, बैंकों द्वारा ऋण राशि कम करने के बाद धन की चुनौतियों का सामना कर रहा है। नई भर्ती रोक दी गई है।

Web Title : Oracle Layoffs 2026: AI Impact, 30,000 Jobs at Risk?

Web Summary : Oracle plans massive layoffs of 30,000 employees by 2026. This restructuring, driven by AI and data center expansion, faces funding challenges after banks reduced loan amounts. New hiring is paused.