lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चिनी वस्तूंच्या बहिष्कारामुळे देशी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला संधी

चिनी वस्तूंच्या बहिष्कारामुळे देशी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला संधी

चिनी आयातीला तातडीने पर्याय निर्माण करण्याची गरज उद्योगजगतातून व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:15 AM2020-06-20T04:15:43+5:302020-06-20T04:16:07+5:30

चिनी आयातीला तातडीने पर्याय निर्माण करण्याची गरज उद्योगजगतातून व्यक्त

Opportunity for indigenous electronics industry due to boycott of Chinese goods | चिनी वस्तूंच्या बहिष्कारामुळे देशी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला संधी

चिनी वस्तूंच्या बहिष्कारामुळे देशी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला संधी

पुणे : कोविड-१९ या विषाणूचा उगम चीनमध्ये झाल्यापासूनच देशात चीनविरोधी वातावरण तयार होऊ लागले. त्याला गेल्या काही आठवड्यांमधल्या लडाख सीमेवरच्या चिनी सैन्याच्या दांडगाईमुळे आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे चिनी आयातीला तातडीने पर्याय निर्माण करण्याची गरज उद्योगजगतातून व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये भारतात चीनमधून होणारी आयात काही पटींमध्ये वाढत गेली आहे. त्यातही इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री, औषध उत्पादन आणि फर्निचर या चार क्षेत्रांमध्ये भारत चिनी मालावर प्रचंड प्रमाणात अवलंबून आहे. म्हणजेच या चारही क्षेत्रात होणाऱ्या एकूण आयातीपैकी थेट ५० टक्क्यांपेक्षा अधिक माल हा चिनी असतो. चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या राष्ट्रीय मोहिमेमुळे पर्याय ठरू शकणाºया देशी मालाच्या उत्पादनांना कधी नव्हे इतकी प्रचंड मोठी संधी निर्माण झाली आहे.

कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)ने दिलेल्या माहितीनुसार, औषध उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या मालाची सर्वाधिक आयात चीनमधून होते. ही चिनी आयात थेट ६५ ते ७० टक्के एवढी मोठी आहे. या खालोखाल सर्वात मोठे परावलंबित्व आहे ते इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे. कॉम्प्युटर, ब्रॉडकास्टिंग यंत्रसामग्री, स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही, टेलिकॉम आदींची देशाच्या एकूण आयातीपैकी ४५ टक्के आयात एकट्या चीनमधून होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देशातले ७२ टक्के स्मार्टफोन चीनमध्ये तयार झालेले आहेत. वाहन उद्योगातील २५ टक्के सुटे भाग चीनमधून आयात होतात. या शिवाय शेतीसाठी आवश्यक खतांसाठीही भारत चीनवर अवलंबून आहे. लागणाºया एकूण खतांपैकी २८ टक्के खते चीनमधून येतात.

थर्मेक्सचे व्यवस्थापकीय संचालक एस. उन्नीकृष्णन यांचे मत वेगळे आहे. ते म्हणाले, चिनी आयात बंद केल्याचा प्रतिकूल परिणाम लगेच होणे स्वाभाविक आहे. पण चिनी आयातीला पर्याय देण्याची क्षमता देशात आहे. चीनची काही उत्पादने स्वस्त असल्याने आम्ही त्यांच्यावर अवलंबून होतो. मात्र त्यालाही हळूहळू देशांतर्गत पर्याय निर्माण करता येतील. भारताने जर चिनी आयात बंद करण्याचे ठरवले तर यामुळे उत्पादन घसरू शकते. मात्र इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी आवश्यक सुट्या भागांसाठी जग फार काळ चीनवर अवलंबून राहू शकणार नाही, असे मत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सीईओ जॉर्ज पॉल यांनी व्यक्त केले आहे.

क्षेत्र भारतीय बाजारपेठ चिनी आयात
(रु पये) (टक्के)
मोबाईल फोन २ लाख कोटी ७२
टेलिकॉम साहित्य १२ हजार कोटी २५
आॅटो पार्टस् १ लाख ३७ हजार कोटी २५

चीनमधल्या आयातीला तातडीने पर्याय निर्माण करणे सोपे नाही; परंतु भारतीयांकडे असणारी कौशल्ये, दर्जा आणि क्षमता यांच्या आधारे व्हॅल्यू चेन तयार करता येईल. यामुळे भारतीय वाहन उद्योगाचे चीनवरील अवलंबित्व हळूहळू कमी होत जाईल.
- विनी मेहता, महासंचालक, आॅटोमोटिव्ह कॉम्पोनण्ट
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

Web Title: Opportunity for indigenous electronics industry due to boycott of Chinese goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन